BSNL Network in Your Area : वेगवेगळ्या मोबाईल नेटवर्कचे मोबाइल रिचार्ज प्लॅन महाग झाल्याने ग्राहक वर्ग नाराज असल्याचे दिसून येत आहे. अश्यात ग्राहक वर्ग खासगी कंपन्यांऐवजी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे (BSNL) वळत आहेत. बीएसएनएलचे प्लॅन खूप स्वस्त असल्याने ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे.
पण बीएसएनएल नेटवर्कवर स्विच करण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे तुमच्या परिसरात बीएसएनएलचा टॉवर आहे का? कारण बीएसएनएल नेटवर्कबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. जर तुम्हाला खाजगी कंपनीचे नेटवर्क नको असेल आणि कमी दरात बीएसएनएल नेटवर्क वापरायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
तुमच्या परिसरात बीएसएनएलचा टॉवर आहे का याची माहिती मिळवण्यासाठी अगदी काही सोप्या स्टेप्सनी तुम्ही माहिती मिळवू शकता.
सरकारी वेबसाइटवर जा: https://tarangsanchar.gov.in/emfportal या वेबसाइटवर 'माय लोकेशन'वर क्लिक करा.
माहिती भरा: तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाका.
ओटीपी मिळवा: तुमच्या ईमेलवर ओटीपी येईल, तो टाकताच एक मॅप उघडेल.
टॉवर शोधा: मॅपवर तुमच्या परिसरातील सेल फोन टॉवर दिसतील.
माहिती मिळवा: टॉवरवर क्लिक केल्यावर सिग्नल प्रकार (2G/3G/4G/5G) आणि ऑपरेटरची माहिती मिळेल.
जर तुमच्या परिसरात बीएसएनएलचा टॉवर असेल तर तुम्हाला चांगला नेटवर्क अनुभव मिळू शकता. पण टॉवर नसल्यास तुमच्यासाठी बीएसएनएल योग्य पर्याय ठरणार नाही.
खाजगी कंपनीचे ग्राहक असाल तर काय कराल?
जर तुम्ही Reliance Jio, Airtel किंवा Vodafone Idea उर्फ Vi कंपनीचे ग्राहक असाल आणि तुमचा नंबर बीएसएनएलवर पोर्ट करू इच्छित असाल तर त्या कंपन्यांच्या वेबसाइटवर पोर्टिंगची प्रक्रिया पाहू शकता.
जर तुम्ही खाजगी नेटवर्क कंपन्यांच्या रीचार्जमधील दरवाढीमुळे त्रस्त असाल तर बीएसएनएलकडे जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या परिसरातील बीएसएनएलची उपलब्धता तपासणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या मोबाईल नेटवर्कबद्दल योग्य निर्णय घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.