फोनमधील धोकादायक App शोधा Googleच्या मदतीने, 'ही' आहे पध्दत

google
googlegoogle
Updated on

सध्याच्या काळात बऱ्याचदा पैशांचे व्यवहार आपण ऑनलाईन करतो. मात्र गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या मोबाइल फोनमध्ये असलेल्या काही धोकादायक अ‍ॅप्सच्या मदतीने अशा घटना घडविल्या जातात, ज्यामध्ये तुमच्या फोन वरून डेटा चोरण्याचे आणि बँक पासवर्ड चोरण्याचे काम केले जाते. पण प्रश्न हा आहे की आपल्या फोनमधील हे धोकादायक अ‍ॅप्स कसे ओळखावेत. तुम्हाला या कामात Google मदत करेल. गुगल तुम्हाला कसे मदत करु शकते या बद्दल आपण आज जाणून घेणर आहोत. (how-to-check-dangerous-apps-of-your-phone-using-google-protect-know-process)

Google वेळोवेळी आपले Google Play Store स्कॅन करुन धोकादायक अॅप्स ब्लॉक करत असते. परंतु काहीवेळा मालवेअरने संक्रमित अ‍ॅप्स Google ला फसवून मोबाइल फोनमध्ये पोहोचतात. तसेच बर्‍याच वेळा वापरकर्ते दुसर्‍या प्लॅटफॉर्मवरून अ‍ॅप डाउनलोड करतात, ज्यामुळे मालवेयरचा संसर्ग होऊ शकतो. आपण Google वापरुन असे अॅप्स स्कॅन करू शकता.

धोकादायक App कसे शोधावेत?

  • सर्व प्रथम मोबाइलवर Google Play अॅप उघडा.

  • यानंतर टॉपला दिसणार्‍या प्रोफाइल चिन्हावर टॅप करा.

  • येथे आपल्याला Play Protect हा पर्याय दिसेल ज्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल.

  • Play Protect वर जाऊन वापरकर्ते आपल्या फोनमध्ये धोकादायक अॅप्स आहेत की नाही हे स्कॅन करून पाहू शकतात.

google
Airtel चा कुटुंबासाठी बेस्ट प्लॅन, 260 GB डेटा अन् बरंच काही

Google Play Protect

  • वापरकर्त्याने नेहमीच Google Play Protect पर्याय चालू ठेवला पाहिजे.

  • Play Protect डीफॉल्टनुसार चालू ठेवलेले असते.

  • परंतु ते नसल्यास Google Play Store एप्लिकेशन Google Play उघडा.

  • वरच्या उजव्या कोपर्‍यात प्रोफाईल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा

  • यानंतर सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा.

  • येथे दोन पर्याय दिसतील Scan Apps with Play Protect आणि Improve harmful App detection वापरकर्त्याने हे दोन्ही पर्याय ऑन कले पाहिजेत.

(how-to-check-dangerous-apps-of-your-phone-using-google-protect-know-process)

google
एका स्मार्टफोनवर चालवा दोन WhatsApp अकाउंट, जाणून घ्या ट्रिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.