Indian Railways : IRCTCद्वारे तुम्ही प्रवासासाठी तिकीट बुकिंग करता आणि काही कारणास्तव तुम्हाला कन्फर्म तिकीट किंवा वेटिंग तिकीट कॅन्सल करावे लागते. पण टिकीतच रिफंड मिळाल की नाही,अजून मिळाल नाही तर कधी मिळणार आणि टिकीटाची किती रक्कम परत मिळणार याच टेंशन येतच. पण तुमच टेंशन दूर करण्यासाठी IRCTCने एक चॅटबॉट लॉंच केले होते. ते म्हणजे 'AskDisha'.
आता तुमची रेल्वे तिकीट रिफंड स्थिती "आस्कदिशा" चॅटबॉटच्या मदतीने त्वरित आणि सहजपणे जाणून घ्या. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित हा चॅटबॉट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो.
आस्कदिशा (डिजिटल इंटरेक्शन टू रिक्वेस्ट हेल्प एनीटाइम) चॅटबॉटद्वारे तुम्ही तुमची रिफंड स्थिती तपासण्याबरोबरच तिकीट बुकिंग आणि इतर सेवांसाठी देखील OTP सत्यापन (Vertification) प्रक्रियेद्वारे मदत मिळवू शकता. त्यासाठी तुमच्या IRCTC युजर आयडी आणि पासवर्डची आवश्यकता नाही.
आस्कदिशा 2.0 च्या नवीन वैशिष्ट्यांचा वापर करून तुम्ही तिकीट बुकिंग, Cancellation आणि रिफंडची स्थिती तपासू शकता. त्यामुळे आता तिकीट रद्द करणे , TDR फायलिंग आणि अयशस्वी व्यवहार यांमुळे झालेल्या रिफंड संदर्भातील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही थेट या चॅटबॉटकडून मिळवू शकता. तुमच्या PNR किंवा व्यवहार क्रमांकाद्वारे तुम्ही तुमची माहिती AskDisha ला देऊ शकता आणि त्वरित तुमच्या रिफंड स्थितीची माहिती मिळवू शकता.
IRCTC ची वेबसाइट (irctc.co.in) उघडा.
वेबपेजच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या "AskDisha" वर क्लिक करा.
"रिफंड स्थिती" वर क्लिक करा.
"Ticket Cancellation", "अयशस्वी व्यवहार" किंवा "TDR" यापैकी एक पर्याय निवडा.
तुमच्या निवडीनुसार माहिती द्या (उदा. PNR क्रमांक)
आवश्यक माहिती सबमिट केल्यानंतर, AskDisha तुम्हाला तुमच्या रिफंडची स्थिती त्वरित कळवेल.
त्यामुळे, आता रेल्वेच्या तिकीट रिफंडची माहिती मिळवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर रांगेत थांबायची गरज नाही. अगदी काही सोप्या स्टेप्समध्येच तुम्ही रिफंड मिळवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.