How To Check PNR Status: तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले की नाही?, असं करा चेक

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा
How To Check PNR Status
How To Check PNR Statusesakal
Updated on

 How To Check PNR Status: रेल्वेने प्रवास करायचा असेल तर आधी तिकीट बुक केल जातं. आणि नंतर ते कन्फर्म आहे की नाही हे तपासावं लागतं. यासाठी वारंवार स्टेशनचे हेलफाटे घालण्याची गरज नाहीय. तर, ते आता ऑनलाईनही तपासता येतं. कसं ते पाहुया.

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा देण्यात आली आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे पीएनआर स्टेटस तपासू शकता. येथून तुम्ही ट्रेनची स्थिती आणि इतर अनेक माहिती तपासू शकता. WhatsApp वर PNR आणि थेट ट्रेनची स्थिती तपासण्यासाठी, चॅटबॉटमध्ये 10 अंकी PNR क्रमांक टाकावा लागेल. हे कसे करायचे ते आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहोत.

How To Check PNR Status
Chin War Training : युद्धनौका, लढाऊ विमाने आदींच्या सरावाने चीनकडून तैवानची कोंडी

असे चेक करा तिकीट

  • आपल्या स्मार्टफोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जा. या ठिकाणी Railofy चा ट्रेन चौकशी नंबर (+91-9881193322) सेव्ह करा.

  • आता, WhatsApp ओपन करा आणि Railofy च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडो मध्ये जा.

  • पुन्हा तुम्हाला आपल्या ट्रेनचा १० अंकाचा पीएनआर नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. नंतर याला सेंड करावे लागेल.

  • Railofy चॅटबॉट पीएनआर स्थिती, ट्रेनची स्थिती आणि अलर्ट सारख्या डिटेल्सची माहिती तुम्हाला पाठवली जाईल.

  • चॅटबॉट आता ऑटोमॅटिकली तुम्हाला WhatsApp वर ट्रेनची रिअल टाइम स्थिती पाठवेल.

How To Check PNR Status
Business Training : पॅकेजिंग व्यवसाय सुरू करायचाय? जाणुन घ्या नवउद्योजकांसाठीचे हे खास प्रशिक्षण

जर तुम्हाला आता ऑनलाइन जेवण कसे ऑर्डर करायचे आहे. यासंबंधी माहिती करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी याचीही स्टेप बाय स्टेप प्रोसेस माहिती देत आहोत.

  • आता तुम्हाला एक नंबर सेव्ह करायचा आहे. हा Zoop चा आहे. WhatsApp चॅटबॉट नंबर +91 7042062070 आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.

  • WhatsApp मध्ये Zoop चॅटबॉट विंडो ओपन करा.

  • चॅट मध्ये १० अंकाचा पीएनआर नंबर टाका. व आपल्या पुढील अपकमिंग स्टेशनची निवड करा.

  • Zoop चॅटबॉट तुम्हाला निवडण्याची रेस्टॉरेंटचा ऑप्शनची एक लिस्ट देईल. तुम्हाला तुमच्या मन पसंतीचे रेस्टॉरेंट वरून जेवण ऑर्डर करणे आणि नंतर पेमेंट ऑनलाइन करावे लागेल.

  • चॅटबॉट तुम्हाला चॅटबॉटवरून आपल्या जेवणाला ट्रॅक करण्याची सुविधा सुद्धा देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()