Gaming Laptop vs Gaming Desktop : तुम्ही तुम्हाला ऑनलाईन गेमिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा गेमिंगमध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेमिंग लॅपटॉप आणि गेमिंग डेस्कटॉप यांच्यापैकी काय विकत घ्यावं याबद्दल संभ्रम असेल तर तुमच्यासाठी काय योग्य ठरेल याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
गेमिंग लॅपटॉप आणि गेमिंग डेस्कटॉप यांच्यात तुलना केल्यास नेमकं तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगलं आहे हे ठरवता येईल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया...
गेमिंग लॅपटॉप डेस्कटॉपपेक्षा अधिक पोर्टेबल
डेस्कटॉपपेशा गेमिंग लॅपटॉप हे नेहमीच अधिक पोर्टेबल ठरतात. ते सोबत घेऊन प्रवास करणे खूपच सोप्पं आहे. बॅकपॅकमध्ये सहजपणे बसू शकतो ज्यामुळे गेमिंग लॅपटॉपबद्दल ही खूप महत्वाची बाब आहे. दुसरीकडे, अगदी लहान डेस्कटॉप देखील वाहून नेण्यासाठी लक्षणीयरीत्या अवजड असेल. कारण की तुम्हाला मॉनिटर, कीबोर्ड आणि सीपीयू हे माऊससारख्या इतर अॅक्सेसरीज देखील सोबत घ्याव्या लागतील. या बाबतीत गेमिंग लॅपटॉप हा स्पष्टपणे चांगला पर्याय आहे.
हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
अपग्रेड करण्यासाठी गेमिंग डेस्कटॉप लॅपटॉपपेक्षा सोपा ठरतो
डेस्कटॉपचे पार्ट लॅपटॉपपेक्षा लवकर बदलता आणि अपग्रेड करता येतात.तुम्ही डेस्कटॉपचा प्रत्येक घटक मदरबोर्ड ते CPU आणि अगदी पॉवर सप्लाय युनिटपर्यंत बदलू आणि अपग्रेड करू शकता. दुसरीकडे, लॅपटॉपचे अत्यंत मर्यादित घटक अपग्रेड करण्यायोग्य आहेत.
उदाहरणार्थ, तुम्ही बहुतेक लॅपटॉपचे मदरबोर्ड, कूलिंग सिस्टम किंवा CPU अपग्रेड करू शकत नाही. येथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खरेदी करताना तुम्ही स्वतःसाठी पूर्णपणे कस्टमाइझ गेमिंग डेस्कटॉप तयार करून घेऊ शकता.
किंमतीचं काय?
दोन्हीत कॉन्फिगरेशनचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने गेमिंग डेस्कटॉप आणि लॅपटॉपची थेट किंमतीनुसार तुलना करणे खूप कठीण आहे. सामान्यतः गेमिंग डेस्कटॉप समान हार्डवेअर असलेल्या लॅपटॉपपेक्षा किंचित स्वस्त असतात.
पण खरे सांगायचे तर, डेस्कटॉपसाठी मॉनिटर तसेच कीबोर्ड, माऊस किंवा स्पीकर यांसारख्या इतर अॅक्सेसरीजचा विचार केल्यास ते देखील बदलते. त्यामुळे, एकदा तुम्ही गेमिंग डेस्कटॉपच्या किमतीत या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला लॅपटॉप प्रमाणेच खर्च येईल. त्यामुळे डेस्कटॉप आणि लॅपटॉप किमतीच्या बाबतीत एकाच पातळीवर येतात.
परफॉर्मन्स
गेमिंग डेस्कटॉप नेहमीच कामगिरीच्या बाबतीत समान किंमतीच्या लॅपटॉपला मागे टाकेल. कामगिरी 100% तुम्ही निवडलेल्या स्पेसिफिकेशन्सवर अवलंबून असेल. समान हार्डवेअर असलेल्या लॅपटॉपपेक्षा डेस्कटॉपवर नेहमीच चांगले काम करेल.
गेमिंग लॅपटॉप Vs गेमिंग डेस्कटॉप काय उपयोगी ठरेल?
वरील सर्व बाबींचा विचार केल्यास गेमिंग डेस्कटॉप सहजपणे अपग्रेड करण्यायोग्य आणि गेमिंग लॅपटॉपपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. खरेदी करताना डेस्कटॉप देखील सहज कस्टमाइज करता येतात कारण तुम्ही तुम्हाला हवे तस डेस्कटॉप तयार करून घेऊ शकता, याबाबत तुमची कल्पनाशक्ती ही तुमची मर्यादा आहे. दुसरीकडे, जर तुमच्या घरामध्ये जागा कमी असेल आणि तुम्ही प्रवास करणार असाल, तर लॅपटॉप हा योग्य पर्याय आहे.
जर तुम्हाला लॅपटॉपवर जास्त परफॉर्मन्स हवा असेल तर तुम्हाला डेस्कटॉपपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. तसेच, लॅपटॉप कमी अपग्रेड करण्यायोग्य असल्यामुळे, तुम्हाला काही वर्षांनी तो बदलावा लागेल आणि नवीन खरेदी करावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.