ChatGPT Images : केवळ सबस्क्रिप्शन असणाऱ्यांसाठीची ही सुविधा झाली फ्री! ChatGPT मध्ये मिळतील एकदम भारी AI फोटो, कसे बनवायचे?

AI Images Making Tips : केवळ सबस्क्रिप्शनधारकांसाठी उपलब्ध असलेली AI इमेज जनरेशनची सुविधा ओपनएआयने सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी खुली केली आहे.
Generate AI Images for Free with ChatGPT
Generate AI Images for Free with ChatGPTesakal
Updated on

AI Tech Tips : जगात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रयोगांनी जगभरातील तंत्रज्ञान प्रेमींना नेहमीच काहीतर नवीन दिले आहे. यामध्ये भर घालत आता एकीकडे चॅटजीपीटीने आपल्या चॅटिंग कौशल्यांनी तर दुसरीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने आपल्या इमेज जनरेशन सुविधेने एआय वापरकर्त्यांना एकदम खुश करून टाकले आहे.

आतापर्यंत केवळ सबस्क्रिप्शनधारकांसाठी उपलब्ध असलेली AI इमेज जनरेशनची सुविधा ओपनएआयने सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी खुली केली आहे. आता तुम्हीही तुमच्या आवडीचे फोटो तुमच्या कल्पनेनुसार चॅटजिपिटीवरच तयार करू शकता.

यासाठी तुम्हाला केवळ ChatGPT चा वापर करायचा आहे. तुमच्या दैनंदिन चॅटिंगसाठी वापरत असलेल्या चॅटजीपीटीच्या मदतीने तुम्ही आता कलाकृतीही उभी करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या मनातील प्रतिमेचे वर्णन करायचं आहे. हे प्रॉम्प्ट तिथे टाकल्यानंतर आणि चॅटजीपीटी तुमच्या कल्पनेला वास्तव रूप देईल.

Generate AI Images for Free with ChatGPT
ChatGPT Advanced Voice : चॅटजीपीटीला मिळाला स्वतःचा आवाज; आता टायपिंग न करता हवं ते विचारा,कसं वापराल हे नवं फीचर?

ChatGPT वर AI इमेज कशी बनवाल?

१. चॅटजीपीटीची वेबसाइट किंवा अॅप ओपन करा. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या AI इमेजेस तयार करू शकता. इंटरफेस खूप सोपे आहे.

२. तुम्हाला कोणत्या प्रकारचे चित्र हवे आहे ते चॅटजीपीटीला सांगा. तुम्ही खूप डिटेलमध्ये सांगू शकता किंवा तुमची कल्पना सांगूनही चालेल.

३. तुमच्या वर्णनानंतर तुम्ही इमेजची सेटिंग्ज बदलू शकता. रंग, स्टाइल, रेसोल्यूशन यामध्ये बदल करून तुम्ही तुमच्या इमेजला परफेक्ट बनवू शकता. जर तुम्हाला कसे वर्णन करावे हे कळत नसेल तर चॅटजीपीटी तुम्हाला मदत करेल.

४. तुमचे सर्व इनपुट दिल्यानंतर तुम्ही इमेज जनरेट करण्याचा ऑप्शन निवडा. तुमच्या वर्णनानुसार चॅटजीपीटी इमेज तयार करेल. यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

५.इमेज तयार झाल्यानंतर ती पहा. जर तुम्हाला काही बदल हवे असतील तर तुम्ही वर्णन किंवा सेटिंग्ज बदलून पुन्हा इमेज तयार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीची इमेज तयार करू शकता.

Generate AI Images for Free with ChatGPT
Youtube AI : यूट्यूब क्रिएटर्ससाठी खुशखबर! यूट्यूबमध्ये होतीये AIची एंट्री; देणार नवनवीन आयडिया अन् एक खास सेफ्टी फिचर

या नव्या फीचरमुळे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या डिझाइन किंवा प्रतिमेची गरज पडली तरी तुम्हाला बाहेरच्या मदतीची गरज पडणार नाही. तुमच्या मनातली कल्पना तुम्ही शब्दांत व्यक्त करा आणि चॅटजीपीटी तुमच्यासाठी ती प्रतिमा तयार करेल.

यामुळे कलाकारांनाही एक नवीन माध्यम मिळाले आहे. ते आता आपल्या कल्पनांना नव्या पद्धतीने व्यक्त करू शकतात. तसेच सामान्य वापरकर्त्यांनाही आपल्या सोशल मीडिया पोस्ट्ससाठी आकर्षक इमेजेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यामुळे नक्कीच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात एक नवी क्रांती होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com