Gpay History : क्षणात डिलीट होईल Gpay हिस्ट्री, फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Online Transaction Tips : आपल्या Google Pay ची ट्रान्सॅक्शन हिस्ट्री आपण पाहू शकतो आणि डिलीट सुद्धा करू शकता. त्यासाठीच काही सोप्या पद्धती आहेत.
Google Pay History Delete
Google Pay History Deleteesakal

Tech Tips : Google Pay भारतात सर्वाधिक वापरली जाणारी पेमेंट सोल्युशन आहे. यूपीआय आधारित हा पेमेंट सिस्टिम अगदी सहजतेने कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स करण्याची सुविधा देते. पण, यासोबतच थोडीशी गोपनीयतेचीही किंमत मोजावी लागते. Google Pay तुमची ट्रान्सॅक्शन हिस्ट्री साठवून ठेवते. पण, कंपनी तुम्हाला Google Pay ची ट्रान्सॅक्शन हिस्ट्री सहजतेने डिलीट करण्याचा पर्याय देते.

आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही Google Pay अॅप्लिकेशन किंवा लॅपटॉप वापरून तुमची Google Pay ट्रान्सॅक्शन हिस्ट्री डिलीट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगतो. तर, चला सुरुवात मग जाणून घेऊया.

आपल्या Google Pay ची ट्रान्सॅक्शन हिस्ट्री कशी डिलीट करायची?

Google त्यांच्या Google Pay अॅप्लिकेशनवरुन कोणतीही ट्रान्सॅक्शन हिस्ट्री डिलीट करण्याची परवानगी देते. या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत.

मोबाईल अॅप्लिकेशनमधून Google Pay ची ट्रान्सॅक्शन हिस्ट्री सहजतेने डिलीट करता येते. कसे ते पाहूया.

Google Pay History Delete
UPI Payment : नो टेन्शन! इंटरनेटशिवायही ऑनलाइन पेमेंट करू शकता, फॉलो करा 'या' स्टेप्स
  • तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अॅप्लिकेशन उघडा आणि प्रोफाइल सेक्शनवर टॅप करा.

  • खाली स्क्रोल करा, सेटिंग्जवर टॅप करा आणि नंतर प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पर्यायावर जा.

  • आता, पेमेंट्स आणि सब्सक्रिप्शन्स > पेमेंट्स इन्फोवर जा आणि मॅनेज एक्सपीरियन्सवर टॅप करा.

  • पेमेंट्स ट्रान्सॅक्शन्स आणि अॅक्टिव्हिटी अंतर्गत तुम्हाला Google Pay ट्रान्सॅक्शन्सची यादी दिसून येईल.

  • तुम्ही एखादी विशिष्ट ट्रान्सॅक्शन डिलीट करायची असल्यास, त्या ट्रान्सॅक्शनच्या बाजूला असलेल्या क्रॉस बटनवर टॅप करा.

  • संपूर्ण ट्रान्सॅक्शन हिस्ट्री एकदातून डिलीट करण्यासाठीही पर्याय आहे. ट्रान्सॅक्शनच्या वरच्या बाजूला तुम्हाला डिलीट पर्याय दिसून येईल.

  • तुमच्या आवडीनुसार टाइमफ्रेम निवडा आणि तुमची Google Pay अॅप्लिकेशनमधून डाटा डिलीट केला जाईल.

Google Pay History Delete
Whatsapp Update : लवकरच या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद; कंपनीने यादी केली जाहीर, यात तुमचा मोबाईल तर नाही ना?

डॅस्कटॉप Google Pay ट्रान्सॅक्शन हिस्ट्री डिलीट

Google तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवरुन Google Pay ची ट्रान्सॅक्शन हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही देते. ते कसे करायचे ते पाहूया.

  • https://myaccount.google.com/ या वेबसाईटवर जा आणि पेमेंट्स आणि सब्सक्रिप्शन्स पर्यायावर क्लिक करा.

  • खाली स्क्रोल करा आणि पेमेंट इन्फो शोधा आणि पेमेंट्स ट्रान्सॅक्शन्स आणि अॅक्टिव्हिटी पर्यायावर क्लिक करा.

  • तुम्हाला Google Pay ट्रान्सॅक्शन्सची यादी दिसून येईल. तुम्ही प्रत्येक ट्रान्सॅक्शन वैयक्तिकरित्या डिलीट करू शकता.

  • संपूर्ण ट्रान्सॅक्शन हिस्ट्री एकदातून डिलीट करण्यासाठीही पर्याय आहे. डिलीट पर्यायवर क्लिक करा आणि ट्रान्सॅक्शन हिस्ट्री आपोआप डिलीट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com