मुंबई : WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. Meta Platforms Inc च्या मालकीच्या WhatsApp चे भारतात सर्वाधिक वापरकर्ते आहेत. WhatsApp वापरकर्ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर भरपूर मीडिया डेटा साठवू शकतात.
यामध्ये फोटो, व्हिडिओ, GIF आणि कागदपत्रांचा समावेश आहे. व्हॉट्सअॅप बॅकअप पर्यायासाठी, वापरकर्त्यांना Google ड्राइव्ह किंवा iCloud (आयफोनसाठी) पर्याय मिळतात.
परंतु कधीकधी असे होते की हा बॅकअप बऱ्याच वापरकर्त्यांसाठी पुरेसा नाही. आणि इतर अनेक वापरकर्ते त्यांचा WhatsApp डेटा Google किंवा Apple डिव्हाइसशी लिंक करू इच्छित नाहीत.
अशा वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे WhatsApp डेटा आणि मीडिया ऑफलाइन डाउनलोड करणे. Android डिव्हाइसवर WhatsApp डेटा ऑफलाइन कसा डाउनलोड करायचा ते पाहू या...
WhatsApp फाइल्स शोधणे
अँड्रॉइड फोनवर, व्हॉट्सअॅप सर्व फाईल्स फोनच्या स्टोरेजमध्ये एका वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवत असे. हे स्टोरेज फोनमध्ये असायचे पण आता हे फोल्डर शिफ्ट करण्यात आले आहे.
WhatsApp फोल्डर शोधण्यासाठी हे करा
फोनच्या अंतर्गत स्टोरेजवर जा आणि नंतर ही प्रक्रिया फॉलो करा
Internal Storage> Android> media> com.whatsapp> WhatsApp> Media using any file explorer
या फोल्डरमध्ये WhatsApp Animated Gifs, WhatsApp Audio, WhatsApp Images आणि WhatsApp Videos असे अनेक उप-फोल्डर सापडतील.
WhatsApp बॅकअप
तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरील कोणत्याही फोल्डरचा बॅकअप घेऊ शकता. यानंतर, आपण ते बाह्य हार्ड ड्राइव्ह किंवा फ्लॅश ड्राइव्हवर स्थानांतरित करू शकता.
तुम्हाला तुमच्या सर्व मीडिया फाइल्सचा बॅकअप घ्यायचा असल्यास, तुम्ही सर्व सब-फोल्डर्ससह संपूर्ण मीडिया फोल्डर कॉपी करू शकता.
तुम्ही तुमच्या नवीन फोनवर WhatsApp इन्स्टॉल करत असाल, तर तुम्हाला ते फोल्डर त्याच ठिकाणी परत मिळू शकेल. मात्र, यासाठी सेव्ह केलेल्या सर्व मीडिया फाइल्स तुम्हाला मॅन्युअली डाउनलोड कराव्या लागतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.