Simple Hacks: कुलरमधून पाणी काढायचे असेल तर फॉलो करा 'हे' हॅक्स

How to Clean Cooler: उन्हाळ्यात कडक उन्हापासून थंडावा मिळण्यासाठी कुलरचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. पण ते स्वच्छ करण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते.
Simple Hacks For Cooler
Simple Hacks For CoolerSakal
Updated on

उन्हाच्या कडक झळांपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक एसी,कूलरचा वापर करतात. पण अनेक घरांमध्ये कुलरचा वापर अधिक केला जातो. कारण कुलरमुळे घर सहजपणे थंड करतो आणि वीजबील देखील जास्त येत नाही. पण कुलरची स्वच्छता करणे अवघड आहे. कुलरमधील पाणी काढायचे असेल तर पुढील हॅक्स वापरू शकता.

कूलरची स्वच्छता आवश्यक

कुलरमधील पाणी वारंवार का बदलावे लागते आणि ते स्वच्छ करण्याची गरज का आहे? कारण कूलरमधील पाणी वारंवार मोटारीच्या साहाय्याने ताट्यांवर पडल्याने घाण होते. त्यामुळे पाण्यात घाण वाढू लागते आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. याशिवाय कीटक आणि डासांची उत्पत्ती होऊ शकते. याचा हवेच्या ताजेपणावर देखील परिणाम होतो, ज्यामुळे कोणीही आजारी पडू शकतो.

सोपी पद्धत

कूलरमधील अस्वच्छ पाणी अगदी सहजपणे काढण्यासाठी सर्वात आधी कुलरचा स्विच बंद करा आणि पॉवर प्लगमधून काढून टाका. यानंतर, कूलरच्या कोणत्याही एका बाजूचे आवरण काढून टाका. आता मोटरमधून जाळीकडे जाणारा पाईप जाळीच्या बाजूने काढा. हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे की मोटरच्या बाजूने पाईप कधीही काढू नका.

Simple Hacks For Cooler
Mobile Internet: मोबाइलचे नेट सारखे बंद पडत असेल तर वापरा 'या' स्मार्ट टिप्स

पाणी बाहेर निघेल

आता पाईपचे बाहेर काढलेले टोक बादलीत ठेवा. यानंतर, कुलर सुरू करा आणि विद्युत पुरवठा चालू करा. यावेळी, फक्त मोटरचा स्वीच चालू करा, तर पंख्याचा स्विच बंद ठेवावा. मोटार चालू होताच कुलरमधील पाणी बादलीत बाहेर पडू लागते. यामुळे काही वेळात कूलरचे पाणी रिकामा होईल. जेव्हा पाणी मोटरच्या खाली पोहोचते तेव्हा मोटार बंद करा. खरं तर, पाण्याशिवाय मोटार चालवल्याने जळू शकते.

अशी करा स्वच्छता

आता कूलरच्या टाकीच्या तळाशी थोडे पाणी शिल्लक राहीले असेल तर यासाठी जाड कापड घ्या. कूलर टाकीच्या तळाशी ठेवा. ज्यामुळे पाणी शोषून घेईल. हे पाणी बादलीत पिळून घ्यावे. जर थोडे जास्त पाणी असेल तर ही प्रक्रिया दोन-तीन वेळा करा. काही वेळात कुलर पूर्णपणे स्वच्छ होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()