तुमच्या आधार कार्डाच्या मदतीने eSign कसे तयार करावे? वाचा

how to e-sign using your aadhaar card check this ste by step process
how to e-sign using your aadhaar card check this ste by step processGoogle
Updated on

आधार कार्ड ही सध्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक बनली आहे ज्याचा वापर वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी स्वत:ची ओळख सिद्द करण्यासाठी केला जात आहे. दरम्यान देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक पुढाकार घेत आहे. यामध्ये तुम्हाला विशेषतः सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज पडते. आज आपण आधार डेटा वापरून कोणत्याही दस्तऐवजावर ई-सही (eSign) कशी करू शकता? याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंटवर ऑनलाइन स्वाक्षरी करण्यासाठी तुम्हाला पेन आणि शाईची गरज पडत नाही. इतर ऑनलाईन कामे होतात तसे आपण ऑनलाइन साइन करू शकता. तुम्ही ई-सिग्नेचर आणि डिजिटल सिग्नेचर हे दोन्ही तुम्हाला सारखे वाटू शकतात, पण दोघांमध्ये बराच फरक आहे. इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी (e Signature) म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी प्रत्यक्षात आपली स्वाक्षरी स्कॅन करून, कंप्युटर स्क्रिनवर स्वाक्षरी करणे, व्हॉईस सिग्नेचरवर किंवा टिक चिन्हावर क्लिक करून करता येते. डॉक्युमेंटच्या तळाशी 'मी सहमत आहे' हे लिहीलेल्या बॉक्सवर क्लिक केले, तर याचा अर्थ देखील आपण त्यावर स्वाक्षरी करण्यासारखीच संमती देतो असा होतो.

डिजिटल स्वाक्षरी (Digital Sign) म्हणजे काय?

हा इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीचा एक प्रकार आहे. हा तुमच्या ओळखीचा एक ठोस पुरावा आहे. जसे तुमचे फिंगरप्रिंट युनिक आहेत तसेच तुमची डिजिटल स्वाक्षरी देखील युनिक आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे एनक्रिप्टेड स्वरूपात केले जाते. एकदा तुम्ही कागदपत्रावर डिजिटल स्वाक्षरी केल्यानंतर, त्यात कोणतेही बदल करता येत नाहीत.

how to e-sign using your aadhaar card check this ste by step process
प्रत्येक सेगमेंटमधील कोणत्या कार देतात बेस्ट मायलेज? पाहा यादी

ESign कशाला हवं?

जर तुम्ही कोणत्याही संस्थेत गेलात जेथे तुम्हाला आधार क्रमांकाच्या मदतीने ई-स्वाक्षरी करण्यास सांगितले जाऊ शकते. यामध्ये सरकारी संस्था आणि बँका इत्यादी असू शकतात. काही दिवसांपूर्वी अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ई-स्वाक्षरी सुविधा सुरू केली आहे. हे खरोखरच पेपरलेस बँकिंगच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आता बँक आपल्या ग्राहकांना ई-स्वाक्षरीची सुविधा देत आहेत. ई-साइन आता कायदेशीररित्या वैध आणि सुरक्षित आहे.

हे कसे काम करते?

साधारणपणे बँका किंवा इतर सरकारी संस्था ई-स्वाक्षरीसाठी थर्ड पार्टी व्हेंडरशी संपर्क साधतात. एकदा बँकेला तुमचे आधार तपशील मिळाले की ते त्याची पडताळणी केली जाते आणि नंतर तुमच्यासाठी डिजिटल सिग्नेचर तयार करण्यास सांगतले जाते. हे फक्त काही मिनिटांचे काम आहे. एकदा आपण आपली ई-स्वाक्षरी मिळाल्यानंतर, आपण आपल्या डॉक्युमेंटवर डिजिटल सिग्नेचर करू शकता. यासह, आपण ई-साइनच्या मदतीने आपल्या डिजिटल लॉकरचा एक्सेस देखील मिळवू शकता. डिजिटल लॉकरमध्ये तुम्ही तुमची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवू शकता.

how to e-sign using your aadhaar card check this ste by step process
पुढच्या महिन्यात येतेय Tata ची CNG कार; मिळेल जबरदस्त मायलेज

ESign चे फायदे आणि फीचर्स

ई -साईनच्या मदतीने तुम्ही तुमच्या कागदपत्रांवर कधीही, कुठेही सुरक्षितपणे स्वाक्षरी करू शकता. eSign कायदेशीररित्या वैध आहे आणि यामुळे याचा वापर अनेक ठिकाणी अगदी सोप्य पध्दतीने केला जातो. या फीचर्समुळे वापरकर्त्याची प्रायव्हसी देखील सुरक्षित राहते.

आधार eSign ऑनलाइन कसे करावे

  • व्हॅलिडेट करण्यासाठी https://uidai.gov.in/ वेबसाइट किंवा https://eaadhaar.uidai.gov.in वेबसाइटवर जा.

  • या वेबसाइटवर गेलात की, “Validity Unknown” वर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमच्यासमोर सिग्नेचर व्हेरिफीकेशन विंडो उघडेल

  • आता तुम्हाला '‘Signature properties’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर पुढे, तुम्हाला ‘Show certificate’ ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • आता ‘NIC Sub-CA for NIC 2011, National Informatics Centre’' वर क्लिक करा.

  • पुढच्या स्टेपमध्ये 'ट्रस्ट' टॅबवर जा आणि 'अॅड टू ट्रस्टेड आयडेंटिटी' वर क्लिक करा.

  • आता पुढच्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचे सिग्नेचर व्हॅलिडेट करा वर क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()