Earning from Twitter : YouTube या प्लॅटफॉर्मद्वारे पैसा कमावण्याची मोठी संधी असल्याचं आपणास माहीतच असेल. पण आता ‘ट्विटर’द्वारेही आपण कमाई करू शकता. हो मित्रांनो, ही माहिती खरी आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना बंपर कमाई करण्याची संधी मिळत आहे.
हे पैसे 'X' (म्हणजेच ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या बदल्यात मिळत आहेत. जसे YouTube कंपनी क्रीएटर्संसोबत अॅड रेव्हेन्यू (ad revenue) शेअर करते, त्याचप्रकारे आता X देखील युजर्संना मोबदला देत आहे.
‘X’च्या माध्यमातून किती कमाई केली, याबाबतची माहिती देणारे स्क्रीनशॉट कित्येक युजर्संकडून गेल्या आठवड्यात शेअर करण्यात आले आहेत. दुसरीकडे कित्येक युजर्स इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई होत असल्यानं आश्चर्य देखील व्यक्त करत आहेत. शिवाय इंस्टाग्राम आणि YouTube च्या तुलनेत X कडून मिळणारी कमाई अधिक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
विशेष बाब म्हणजे युजर्संना कोणत्याही प्रकारे व्हिडीओ किंवा रील्स तयार करावे लागत नाहीयेत. एखाद्या युजर्संचे ट्वीट 15 मिलियनहून अधिक वेळा पाहिले गेल्यास त्याद्वारे बक्कळ कमाई होत आहे. कित्येक युजर्संच्या बँक खात्यात कंपनीकडून गेल्या तीन महिन्यात लाखो रूपये क्रेडीट करण्यात आले आहेत.
काही युजर्संच्या ट्वीट्सना मिळालेल्या रिप्लायमध्ये जाहिराती दिसतात. याच जाहिरातांद्वारे कंपनीला मिळणाऱ्या मिळकतीतील काही रक्कम युजर्संना मिळणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईबाबतची घोषणा Elon Musk यांनीच केली होती. गेल्या महिन्यातच या प्लॅटफॉर्मवर रेव्हेन्यू शेअरिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
या अंतर्गत जाहिरातींद्वारे मिळणाऱ्या मिळकतीतील काही भाग कंपनी युजर्संसोबत शेअर करत आहे. आपल्या भारत देशातील देखील कित्येक युजर्संनाही पेमेंट मिळत आहे. पण यासाठी आपणास काही अटींची पूर्तता करणे देखील आवश्यक आहे. या सुविधेस पात्र होण्यासाठी सर्व अटी-शर्थींची पूर्तता केल्यानंतरच आपण ट्विटरच्या माध्यमातून कमाई करू शकता.
जाणून घेऊया सविस्तर माहिती..
ट्विटर म्हणजेच 'X'च्या माध्यमातून कमाई करायची असल्यास सर्वप्रथम आपल्याकडे Blue Subscription असणे आवश्यक आहे. म्हणजे आपले अकाउंट व्हेरिफाईड असावे. याव्यतिरिक्त युजर्सने पोस्ट केलेल्या मजकुरावर कमीत कमी 1.5 कोटी इतक्या संख्येनं इम्प्रेशन मिळणे गरजे आहे.
सोबतच क्रीएटरचे 500 फॉलोअर्सही गरजेचं आहे. कंपनीनेच Monetizationची माहिती शेअर करत सांगितले होते की युजर्सकडे कमाई करण्याचा एक नवीन संधी आहे. भारतासह जगभरातील क्रीएटर्संना या संधीचे सोने करता येणार आहे.
युजर्संना क्रीएटर Subscription आणि Ads रेव्हेन्यू शेअरिंग सुविधेकरिताही अप्लाय करावे लागणार. एखाद्या युजरने नियमांचे भंग केल्यास त्यांना या कार्यक्रमातून हद्दपार करण्यात येईल.
ट्विटरकडून मिळणारे पैसे क्लेम करण्यासाठी सर्वप्रथम आपणास Monetization हा पर्याय क्लिक करावा लागेल. या पर्यायाच्या शेजारी आणखी पर्याय दिसतील. त्यामध्ये आपणास 'Join and Setup Pay-outs' हा पर्याय दिसेल.
यावर क्लिक केल्यास आपणास Stripeशी कनेक्ट व्हाल. याद्वारे तुम्हाला ऑनबोर्ड केले जाईल आणि तुम्ही केलेली कमाई देखील खात्यात जमा होईल. याच माध्यमातून आपण आपली कमाई डेबिटही करू शकता. येथे युजर्संना आपले एक खाते तयार करावे लागेल. रक्कम काढायची असल्यास तुमच्या खात्यात कमीत कमी 50 डॉलर्स म्हणजेच 4 हजार रूपये एवढी रक्कम असणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.