Tech Tips : जिओवर कॉल फॉरवर्डिंग करणं सोपं आहे. तुम्ही फोनच्या सेटिंग्जमधून किंवा डायलर अॅपमधून कोड वापरूनही ते करू शकता. तुमचा फोन बंद असल्यास, बॅटरी संपत आली असल्यास किंवा तुम्ही व्यस्त असाल तर कॉल फॉरवर्डिंग उपयुक्त ठरते. यामुळे तुमच्या मोबाईलवर येणारे कॉल दुसऱ्या नंबरवर किंवा तुमच्या कुटुंबाच्या/ मित्राच्या फोनवर ट्रांसफर केले जाऊ शकतात.
जिओ तुमच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग सुरु करण्यासाठी खास कोड देते. हे कोड कसे वापरायचे हे तुम्हाला माहिती नसल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जिओ वापरकर्ते फोनच्या सेटिंग्जमधून किंवा खास कोड वापरून कॉल फॉरवर्डिंग करू शकतात. तुमच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार खालील कोड वापरुन तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग सुरु करता येईल.
तुमच्या फोनवरच्या डायलर अॅपमध्ये 401<10-अंकी फोन नंबर> डायल करा. (10-अंकी फोन नंबर म्हणजे ज्या नंबरवर कॉल फॉरवर्ड करायचे आहेत तो नंबर)
'कॉल' बटण दाबा आणि तुमची माहिती सबमिट करा.
एवढं केल्यावर तुमच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग सुरु होईल.
अशीच कॉल फॉरवर्डिंग इतर परिस्थितींसाठी देखील सुरु करता येते जसे की तुम्ही आधीच फोनवर व्यस्त असाल तर, एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार फोन करत असेल तर, किंवा तुमचा फोन बंद असल्यास किंवा सिग्नल कमी असल्यामुळे लागत नसल्यास हे करता येते. वरील परिस्थितींसाठी 3-अंकी कोड अनुक्रमे 405, 403 किंवा 409 असा बदलावा.
तुमच्या फोनवरच्या डायलर अॅपमध्ये खाली दिलेल्या कोडपैकी तुमच्या गरजेनुसार कोड डायल करा.
कोड डायल केल्यानंतर 'कॉल' बटण दाबा आणि त्या विशिष्ट परिस्थितीसाठी कॉल फॉरवर्डिंग बंद होईल.
*402 - सर्व येणारे कॉल फॉरवर्डिंग बंद करण्यासाठी
*406 - व्यस्त असताना येणारे कॉल फॉरवर्डिंग बंद करण्यासाठी
*404 - फोन न उचलल्यास येणारे कॉल फॉरवर्डिंग बंद करण्यासाठी
*410 - फोन बंद असल्यास किंवा सिग्नल नसल्यामुळे जडत नसल्यास येणारे कॉल फॉरवर्डिंग बंद करण्यासाठी
आता तुम्ही तुमच्या जिओ नंबरवर हवे तेव्हा कोणत्याही परिस्थितीत कॉल फॉरवर्डिंग सुरु आणि बंद करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.