Find Social Media Profile : केवळ फोटोच्या मदतीनेही शोधता येईल एखाद्या व्यक्तीचं सोशल मीडिया प्रोफाईल; वाचा टिप्स अन् ट्रिक्स

Reverse Image Search : सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचं अकाउंट शोधायचं असेल, तर तिचं नाव तुम्हाला माहिती हवं. मात्र कित्येक वेळा आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, किंवा माहितही नसतं.
Find Social Media Profile
Find Social Media ProfileeSakal
Updated on

Search social media profile by image : आजकाल सोशल मीडियावर नाही अशी व्यक्ती निराळीच. फेसबुक-इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता अब्जावधी यूजर्स आहेत. यामुळे कित्येकांना आपल्या दूरच्या मित्रांशी कनेक्टेड राहता येणं शक्य झालं आहे. तसंच, फेसबुकच्या मदतीने कित्येकांना आपले लहानपणीचे मित्रही मिळाले आहेत.

सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचं अकाउंट शोधायचं असेल, तर तिचं नाव तुम्हाला माहिती हवं. मात्र कित्येक वेळा आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, किंवा माहितही नसतं. एखाद्या लग्नात भेटलेली व्यक्ती, किंवा पार्टीमध्ये भेटलेली व्यक्ती.. जिच्यासोबत आपले फोटो असतात मात्र नाव आठवत नसल्यामुळे सोशल मीडिया हँडल शोधणं शक्य नसतं.

अशा वेळी काही ट्रिक्स वापरून तुम्ही त्या व्यक्तीचं अकाउंट शोधण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी सध्या कित्येक ऑनलाईन टूल्स उपलब्ध आहेत. तसंच एआयमुळे आता हे काम अगदीच सोपं झालं आहे. विशेष म्हणजे यातील पहिल्या ट्रिकसाठी तर तुम्हाला कोणतंही नवीन अ‍ॅप घेण्याचीही गरज नाही.

Find Social Media Profile
Social Media : इन्स्टाग्राम, टिकटॉक की फेसबुक? कोण ठरलं यंदाचं नंबर वन सोशल मीडिया अ‍ॅप? जाणून घ्या

गुगल सर्च

गुगलचं लेन्स (Google Lens) फीचर आता सर्वांसाठी उपलब्ध आहे. याच्या मदतीने तुम्ही एखादा फोटो गुगल सर्चमध्ये अपलोड करुन त्याच्याशी मिळते जुळते फोटो किंवा लिंक्स शोधू शकता. जर त्या व्यक्तीचं सोशल मीडिया अकाउंट पब्लिक असेल, आणि तिने आपले फोटो शेअर केले असतील, तर सर्चमध्ये त्या अकाउंटची लिंकही मिळण्याची शक्यता आहे.

रिवर्स इमेज सर्च

गुगल आणि TinEye हे दोन टूल्स रिवर्स इमेज सर्चसाठी (Reverse Image Search) अगदी लोकप्रिय आहेत. या दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन, कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा. यानंतर तुमच्याकडे असलेला त्या व्यक्तीचा फोटो अपलोड करा. यानंतर 'सर्च' किंवा 'फाईंड सिमिलर इमेज' या पर्यायावर क्लिक करा. यानंतर गुगल सर्चप्रमाणेच इथेही इतर फोटो आणि त्यांच्या लिंक्स दिसतील.

Find Social Media Profile
Popcorn Brain : सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार; काय आहेत लक्षणं अन् कसा करायचा बचाव?

इतर वेबसाईट्स

याव्यतिरिक्त इतर कितीतरी वेबसाईट्स उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला फोटोच्या मदतीने एखादं सोशल मीडिया हँडल शोधण्याची सोय करतात. Social Catfish, FaceCheck ID, Digital Web Solutions, Bing Visual Search, Yahoo Image Search, Pixsy अशा कित्येक वेबसाईट्सवर ही सोय उपलब्ध आहे. अर्थात, या वेबसाईट्सच्या मदतीने तुम्हाला त्या व्यक्तीचं अकाउंट मिळेलच याची 100 टक्के खात्री देता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.