Weather Alerts : हवामानात बदल होताच मोबाईल देईल अलर्ट; करा फक्त 'ही' सेटिंग

हवामानात बदल झाल्यानंतर तुम्हाला लगेच त्याबाबत माहिती मिळणं गरजेचं आहे.
Weather Alerts on Mobile
Weather Alerts on MobileeSakal
Updated on

सध्या अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाचं संकट घोंघावतंय. तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे सगळ्यांचेच हवामानाचे अंदाज चुकत आहेत. अशा वेळी हवामानात बदल झाल्यानंतर तुम्हाला लगेच त्याबाबत माहिती मिळणं गरजेचं आहे. यासाठी तुमचा मोबाईल तुमची मदत करू शकतो. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणतंही अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.

तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या डिफॉल्ट अ‍ॅपच्या (Weather App) मदतीनेच तुम्ही हवामानाची अचूक माहिती मिळवू शकता. वेधशाळांच्या तुलनेत ही माहिती अधिक बरोबर आणि रिअल-टाईम असते. हवामानाची माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसण्यासाठी तुम्हाला काही सेटिंग करावी लागेल.

Weather Alerts on Mobile
Monsoon Update : मिरगाचा पाऊस कधी पडणार? शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, 'हवामान'चा अंदाजही ठरला फोल

अँड्रॉईड

तुम्ही जर अँड्रॉईड फोन (Weather Alerts on Mobile) वापरत असाल, तर तुम्हाला सगळ्यात आधी होम स्क्रीनवर जायचं आहे. याठिकाणी स्क्रीनवर लाँग प्रेस केल्यावर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यामधील 'widgets' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर 'weather' असं सर्च करा. यानंतर जो पर्याय समोर येईल, त्यावर लाँग प्रेस करून, ते विजेट तुम्ही होम स्क्रीनवर घेऊ शकता.

आयफोन

तुमच्याकडे iOS 16 किंवा त्यापेक्षा पुढची ओएस असणारा आयफोन असेल, तर तुम्ही या स्टेप फॉलो करू शकता. सगळ्यात आधी आपल्या होम स्क्रीनवर जा, आणि लाँग प्रेस करा. यानंतर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात + हे चिन्ह दिसेल. त्यावर टॅप करून, weather असं सर्च करा. त्यानंतर येणारे widget लाँग प्रेस करून होम स्क्रीनला अ‍ॅड करा.

या माध्यमातून तुम्हाला सध्याचं तापमान, हवेतील आद्रता, पुढील काही दिवसांचा अंदाज अशा गोष्टींची माहिती तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसेल.

Weather Alerts on Mobile
Weather Update: उसळलेल्या तुफानी लाटांनी मुंबईकरांना भरली धडकी; राज्याला यलो अलर्ट जाहीर

अलर्ट

तुमच्या फोनच्या स्क्रीनकडे तुमचं कायम लक्ष राहत नाही. त्यामुळे हवामानातील बदलाचे नोटिफिकेशन मिळणं तुमच्यासाठी अधिक फायद्याचं ठरू शकतं. अँड्रॉईड फोनवर हे नोटिफिकेशन सुरू करण्यासाठी तुम्हाला वेगळी सेटिंग करावी लागेल.

यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर अ‍ॅप मॅनेजमेंट हा पर्याय निवडा. त्यानंतर, अ‍ॅप्सच्या यादीतून गुगल हे अ‍ॅप निवडा. यानंतर अ‍ॅप इन्फोमध्ये जाऊन मॅनेज नोटिफिकेशन यावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला Weather Alerts हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून त्यासाठी नोटिफिकेशन सुरू करा. तुम्ही याठिकाणी नोटिफिकेशनची पद्धत, रिंगटोन अशा इतर गोष्टीही निवडू शकता.

Weather Alerts on Mobile
Punjabrao Dakh : पावसाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख खरंच आहेत का हवामानतज्ज्ञ?जाणून घ्या शिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.