आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सचे फायदे काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?

how to get international driving license know procedure in Marathi
how to get international driving license know procedure in Marathi
Updated on

International Driving License : रोड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाते, जेणेकरून ड्रायव्हिंग लायसन्स (driving license) धारक परदेशातही वाहन चालवू शकतात. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स हा तुमच्या सध्याच्या ड्रायव्हिंग लायसन्ससारखेच आहे. फक्त RTO तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे परदेशातील अधिकारी समजू शकतील अशा भाषांमध्ये भाषांतर करतात.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे की ते तुम्हाला कोणतीही अडचणीशीवाय परदेशातील रस्त्यावर वाहन चालवता येते. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स वैध ओळख पुरावा म्हणून देखील वापरले जाऊ शकते, म्हणजे तुम्हाला तुमचा पासपोर्ट सर्वत्र बाळगण्याची गरज नाही.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे

सध्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत.

डेटा रेकॉर्डसाठी तुम्ही प्रवास करत असलेल्या देशाच्या पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत.

प्रवासासाठी काढलेल्या तिकिटाची प्रत.

वयाचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत.

भारतीय नागरिकत्वाचा प्रमाणित पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.

योग्यरित्या स्वाक्षरी केलेले आणि डॉक्टरांनी जारी केलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र

how to get international driving license know procedure in Marathi
सॅमसंगचा परवडणारा स्मार्टफोन, मिळेल 1TB पर्यंत स्टोरेज अन् बरंच काही

अर्ज कसा करायचा?

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येतो. फक्त, वर नमूद केलेल्या कागदपत्रांसह फॉर्म भरणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे.

अर्जदाराला वैद्यकीय आरोग्य फॉर्म CMV 1 आणि 1A भरावा लागेल. अर्जदाराने हा फॉर्म योग्यरित्या भरवा आणि यामध्ये तुम्हाला कोणतीही आरोग्य समस्या असल्याच ती लपविण्याचा प्रयत्न करू नये. फॉर्म CMV 4 हा तुमचा खरा आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज आहे. हा फॉर्म आरटीओच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्याही आरटीओवर मिळून जाईल.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या ऑफलाइन अर्जासाठी, तुम्हाला तुमच्या प्रादेशिक RTO ला भेट द्यावी लागेल, वरील सूचीमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याची फी भरावी लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऑफलाइन आहे. इंटरनॅशनल कंट्रोल ट्रॅफिक असोसिएशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि आवश्यक फॉर्म डाउनलोड करा आणि फॉर्म भरा.

how to get international driving license know procedure in Marathi
'तृतीयपंथीयांबाबत सरकारचा मोठा निर्णय; राजेश टोपेंनी दिल्या सूचना

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारणारे देश

अनेक लहान देशांसह अनेक मोठे देश आहेत जे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारतात. हा ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारणारे काही प्रमुख देश म्हणजे युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपीय उपखंडातील अनेक देश भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारतात. फ्रान्स, स्वीडन आणि जर्मनी सारखे काही देश त्यांच्या राष्ट्रीय भाषांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मागणी करतात, तर युनायटेड किंगडम आणि स्वित्झर्लंड सारखे इतर देश फक्त इंग्रजीमध्ये परवाने स्वीकारतात.

how to get international driving license know procedure in Marathi
चार्जिगचं नो टेन्शन, हे स्वस्तात मस्त नेकबॅंड राहातात 41 दिवस चार्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.