Job at ChatGPT : जगप्रसिद्ध एआय बनवणाऱ्या कंपनीत कशी मिळवायची नोकरी? इंजिनिअरने सांगितली सोपी पद्धत

अल्टमन यांच्यासोबत असलेल्या एका इंजिनिअरने याबाबत माहिती दिली आहे.
Job at ChatGPT
Job at ChatGPTeSakal
Updated on

गेल्या काही महिन्यांपासून चॅटजीपीटी (ChatGPT) या एआय चॅटबॉटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे इतर एआय टूल्सही समोर आले. या एआयमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील असा अंदाज जगभरातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपन एआय या कंपनीतच नोकरी करायची असेल तर?

ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आयआयटी दिल्लीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या चर्चेत त्यांच्या कंपनीतील हायरिंगबाबत प्रश्न (How to get Job at Open AI) विचारण्यात आला. यावेळी अल्टमन यांच्यासोबत असलेल्या एका इंजिनिअरने याबाबत माहिती दिली आहे.

Job at ChatGPT
'AI ठरू शकतं महामारी आणि अणुयुद्धाप्रमाणेच घातक! संपूर्ण मानवता होऊ शकते नष्ट'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

प्रॅक्टिकल नॉलेज

ओपन एआय नोकरीसाठी आलेल्या उमेदवाराचं प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे याला अधिक महत्त्व देतं. त्यामुळेच ओपन एआय आपल्या डेव्हलपर्सना प्रोजेक्ट तयार करण्यासाठी पॉवरफुल लँग्वेज मॉडेल आणि एआय सॉफ्टवेअर्स उपलब्ध करून देतात. तुम्हाला याठिकाणी नोकरी हवी असेल, तर ओपन एआय एपीआय वापरून तुम्ही स्वतःचे प्रोजेक्ट तयार करू शकता.

Job at ChatGPT
AI for Elections : एआय ठरवणार भारताचा पुढचा पंतप्रधान? २०२४ च्या प्रचारात कसा होऊ शकतो वापर?

थेट सीईओंना पाठवा प्रोजेक्ट

तुम्ही तयार केलेले हे प्रोजेक्ट तुम्ही थेट कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांना पाठवू शकता. ओपन एआयमध्ये नोकरी मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग असल्याचं कंपनीच्या एका इंजिनिअरने सांगितलं. तुम्ही स्वतःच आधीपासून काही बनवलं असेल, तर याठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

दुसरी एक पद्धत

तुम्ही दुसऱ्या एका पद्धतीने ओपन एआयमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. कंपनीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर करिअर पेजवर जावं लागेल. याठिकाणी तुम्हाला उपलब्ध व्हेकन्सीबाबत माहिती दिसेल. यानंतर नोकरीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, ईमेल आणि फोन नंबर अशी मूलभूत माहिती द्यावी लागेल. तुम्हाला तुमचा बायोडेटा आणि कधीपर्यंत जॉईन होऊ शकता ही माहिती देखील द्यावी लागेल.

भारतीयांनाही संधी

तुम्ही भारतात असाल, तरीही ओपन एआयमध्ये अर्ज करू शकता. भारतासह इतर देशातील उमेदवारांना इमिग्रेशन, व्हिसा आणि इतर फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी कंपनी पूर्ण मदत करते.

Job at ChatGPT
'ChatGPT सारखं एआय बनवणं भारताला शक्य नाही', सॅम अल्टमन यांचं मत; टेक महिंद्राचे सीईओ म्हणाले 'चॅलेंज मंजूर'!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.