Gmail वरील Spam Mail ने हैराण झाला आहात, तर ‘असे’ बंद करा हे मेल

स्पॅममुळे अनेकदा महत्वाचे ईमेल मिस होतात. जर तुम्हीदेखील अशा स्पॅम मेलमुळे हैराण झाला असाल तर तुमचा इनबॉक्स क्लियर करून या स्पॅम मेलपासून कशी सुटका मिळवता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
How do I stop all the Spam emails on Gmail?
How do I stop all the Spam emails on Gmail? Esakal
Updated on

जीमेल हे सध्याच्या घडीला आपल्यापैकी अनेकांसाठी महत्वाचं असं मेलिंग प्लॅटफॉर्म आहे. खास करून ऍण्डरॉइड मोबाईल वापरकर्त्यांसाठी. कारण ऍण्डरॉइड फोनच्या सेटअपसाठी जीमेल आयडी गरजेची असते. मात्र अनेकदा आपण जीमेल ओपन केल्यानंतर बिना कामाचे मार्केटिंग, प्रमोशन आणि न्यूजलेटरचे मेल पाहायला मिळतात. How to get rid of spam emails on your gmail account

या स्पॅममुळे अनेकदा महत्वाचे ईमेल E-mail मिस होतात. जर तुम्हीदेखील अशा स्पॅम मेलमुळे हैराण झाला असाल तर तुमचा इनबॉक्स क्लियर करून या स्पॅम मेलपासून Spam Mail कशी सुटका मिळवता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

फालतू मेल सबस्क्राइब कसे होतात

जीमेल वर येणाऱे हे बिनकामी मेल येतात तरी कसे असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. मात्र बऱ्याचदा आपल्याकडून विविध वेबसाइट किंवा ऍपवर सबस्क्राइब केल्याने हे मेल येत असतात. हे येण्याची अनेक कारणं आहेत. विविध ऍप आणि वेबसाईटवर अकाउंट बनवल्याने हे मेल येत असतात.

तसचं एखाद्या unknown website ला भेट दिल्याने देखील हे मेल येतात. अनेकदा आपण कमांड न वाचता पुढील स्टेप्स फॉलो करतो किंवा काही वेळा एखाद्या ऍप किंवा वेबसाईटच्या प्रायव्हसी पॉलिसत सबस्क्राईब करणं बंधन कारक असतं न कळत आपण अनेक पर्याय क्लिक करतो आणि मग हे मेल येणं सुरु होते. काही स्टेप्सच्या मदतीने हे मेल रोखता येऊ शकतात. या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. how to block spam emails on gmail

यातील एक पर्याय म्हणजे तुम्ही एखाद्या नको असलेल्या मेलला ओपन करा. हा मेल तळापर्यंत स्क्रोल केल्यास तिथे Unsubscribe हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास एक वेगळी वेब विंडो ओपन होईल.

ज्यात काही पर्याय येतील. हे मेल तुमच्या कामाचे नाहित किंवा आता तुम्हाला हे मेल गरजेचे नाहीत असे काही पर्याय येतील इथून तुम्ही योग्य पर्याय निवडून अनसबक्राइब करू शकता. मात्र काही मेलमध्ये असा unsubscribe करण्याचा पर्याय दिसत नाही. अशा वेळी तुम्हाला इतर मार्ग निवडावे लागतील

हे देखिल वाचा-

How do I stop all the Spam emails on Gmail?
Spam Call : स्मार्टफोनमध्ये करा ही सेटिंग अन् मिळवा सुटका

Spam ईमेल अनसबस्क्राइब करून मास रिपोर्ट करा

  • यासाठी जीमेल लॉगइन करा. त्यानंतर सर्व नको असलेले  स्पॅम मेल मार्क करून टीक करा. यात महत्वाचे मेल सेलेक्ट होणार नाही याची काळजी घ्या.

  • सर्व मेल सिलेक्ट करून झाल्यानंतर वरील बाजूस असेल्या ‘i’ या आयकॉनवर क्लिक करा. इथं तुम्हाला ‘Report spam’ किंवा ‘report spam and unsubscribe’ हे दोन पर्याय दिसतील.

  • इथे दाखवलेली लिस्ट पुन्हा एकदा चेक करा आणि ‘report spam and unsubscribe’ वर क्लिक करा. 

  • यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या मेल आयडीवरून ईमेल येणं बंद होईल. 

  • स्पॅम मेल शोधण्यासाठी तुम्ही सर्चबार मधील उजव्या बाजूला असलेल्या टास्कबारवर क्लिक करू शकता. इथं पुन्हा सर्च पर्यायातून तुम्ही स्पॅम मेल सर्च करू शकता. तसंच अशा मेलचा फिल्टर तयार करू शकता.

मोबाईलमधून स्पॅम ईमेल बंद करणं.

मोबाईलमध्ये जीमेल लॉगइन केल्यावरही अनेक असे स्पॅम मेसेज दिसतील. हे मेल बंद करण्यासाठी नको असलेला मेल ओपन करा. उजव्या बाजुला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. यात ब्लॉक युजर हा पर्याय दिसेल.

तुम्ही ब्लॉक युजरवर क्लिक करताच एक नवं पॉपअप येईल. यात अनब्लॉक सेंडर आणि रिपोर्ट स्पॅम असे दोन पर्याय येतील. यातील स्पॅम रिपोर्टवर क्लिक केल्यास या आयडीवरून येणारे सर्व मेल स्पॅमध्ये जातील. 

अशा प्रकारे तुम्ही जीमेल वर येणाऱ्या स्पॅम मेलचा बंदोबस्त करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com