Computer Tips: तुमच्या कॉम्प्युटरमध्ये वायरस तर नाही? या सोप्या पद्धतीने सुरक्षित करा तुमचा डिव्हाईस

Tips to Remove Viruses and Other Malware: आपल्या संगणकात व्हायरस (Virus) आहे का ते कळणे कठीण असते. पण एखादा व्हायरस असेल तर तो आपल्या संगणकाची माहिती चोरू शकतो किंवा ते कार्यक्षमता कमी करू शकतो
Remove Computer Virus
Remove Computer Virusesakal

Tech Tips : आपल्या संगणकात व्हायरस (Virus) आहे का ते कळणे कठीण असते. पण एखादा व्हायरस असेल तर तो आपल्या संगणकाची माहिती चोरू शकतो किंवा ते कार्यक्षमता कमी करू शकतो. संगणकात व्हायरस आला तर चिंता करू नका.काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून आपण त्याला हटवू शकता.

PC मध्ये व्हायरस असल्याची शंका?

  • अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा (Install Anti-Virus Software): सर्वप्रथम एखादे चांगले अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. हे सॉफ्टवेअर व्हायरसना शोधून त्यांचा नाश करण्यास मदत करते.

  • इंटरनेट बंद करा (Disconnect from Internet): व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याआधी आपल्या संगणकाचे इंटरनेट कनेक्शन बंद करा.

  • सुरक्षित मोडमध्ये रिबूट करा (Reboot in Safe Mode): व्हायरस हटवण्यापूर्वी संगणका सुरक्षित मोडमध्ये (Safe Mode) रिबूट करा.

Remove Computer Virus
UPI Payment : नो टेन्शन! इंटरनेटशिवायही ऑनलाइन पेमेंट करू शकता, फॉलो करा 'या' स्टेप्स
  • तात्पुरत्या फाइल डिलीट करा (Delete Temporary Files): 'डिस्क क्लिनअप' (Disk Cleanup) वापरून संगणकामधील तात्पुरत्या फायली डिलीट करा. काही वेळा व्हायरस याच फायलींमध्ये दडलेले असतात.

  • व्हायरस स्कॅन करा (Run a Virus Scan): अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करून संगणकाची संपूर्ण स्कॅन (Scan) करा. व्हायरस आढळल्यास त्यांना डिलीट करा.

  • संगणक पुन्हा सुरू करा (Reboot Your Computer): व्हायरस हटवल्यानंतर संगणक पुन्हा सुरू करा. आता सुरक्षित मोडची गरज नाही.

  • पासवर्ड बदला (Change All Your Passwords): आपल्या सर्व महत्वाच्या खाण्यांचे पासवर्ड बदला. व्हायरसमुळे जुने पासवर्ड चोरी झाले असतील याची खबरदारी घ्या.

  • सॉफ्टवेअर, ब्राउजर आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करा (Update Software, Browser and Operating System): सॉफ्टवेअर, ब्राउजर आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करा. असे केल्याने नवीन व्हायरसमुळे होणारा धोका कमी होतो.

Remove Computer Virus
Gpay History : क्षणात डिलीट होईल Gpay हिस्ट्री, फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Mac मध्ये व्हायरस

Mac संगणकांमध्येही व्हायरस येऊ शकतात. जर आपल्या Mac मध्ये व्हायरस असल्याची शंका असेल तर-

  • संशयास्पद अॅप्लिकेशन बंद करा.

  • 'Activity Monitor' मध्ये 'MacDefender', 'MacProtector' किंवा 'MacSecurity' ऑप्शन शोधा.

  • हे ऑप्शन आढळल्यास 'Quit Process' करा.

  • 'Applications' फोल्डरमधून संशयास्पद अॅप्लिकेशन डिलीट करा.

  • 'Trash' रिकामा करा.

  • अॅप्स आणि सॉफ्टवेअर अपडेट करा.

वर उल्लेख केलेल्या सोप्या पद्धतींचा अवलंब करून आपण संगणकातील व्हायरस हटवू शकता. जर काही अडचण आली तर अँटी-व्हायरस कंपनीचा ग्राहक सेवा संपर्क साधा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com