Apple AirPods म्हणजे मार्केट मध्ये असलेलं एक बेस्ट वायरलेस हेडफोन आहेत. साहजिकच ब्रॅण्ड ॲपल आहे म्हंटल्यावर त्याची किंमत सुद्धा तशीच असणार, अर्थात हे हेडफोन महाग आहेत. त्यामुळे या हेडफोन्सवर जिथे जिथे सूट म्हणजेच डिस्काउंट मिळेल तिथे तिथे लोकांच्या उड्या पडतात. बऱ्याचदा वर्षातून दोनदा यावर डिस्काउंट ऑफर मिळत असते. पण तुम्ही हे कुठून खरेदी करताय हे सुध्दा महत्वाचं आहे. कधीकधी तुम्हाला बनावट एअरपॉड विकले जाण्याची शक्यता असते. पण हे एअरपॉड खरे आहेत की खोटे ते कसं ओळखायचं?
तर त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. iOS 16 मुळे तुम्हाला आयफोनला कनेक्ट केल्या केल्या समजेल की हे ॲपलचेच एअरपॉड आहेत की बनावट एअरपॉड आहेत.
iOS 16 मध्ये फेक AirPods डिटेक्शनची सुविधा
iPhone 14 लॉन्च इवेंटमध्ये ॲपल कंपनीने डेव्हलपर आणि पब्लिक बीटा टेस्टर iOS 16 RC आणलं. त्याच रिलीझमध्ये, 9to5Mac मध्ये इंटरनल सिस्टम फाइल्स सापडल्या ज्या iOS 16 ला AirPods खऱ्या की बनावट आहेत याचं डिटेक्शन करतात. यापूर्वी ॲपलने iOS 15.2 मध्ये आयफोन आणि आयपॅडचे पार्टस डिटेक्ट करण्यासाठी नवीन अपडेट आणले होते.
ios 16 इन्स्टॉल केल्यानंतर जर कोणी बनावट एअरपॉड वापरण्याचा प्रयत्न केल्यास एक मॅसेज येईल. ''These headphones could not be verified as genuine AirPods and may not behave as expected." या मॅसेज नंतर तुम्हाला Learn More नावाचा ऑप्शन येईल. या ऑप्शन मध्ये तुम्हाला ॲपलच्या हेडफोन्स संबंधी बरीच माहिती मिळते.
यासोबतच Don’t Connect असा ही ऑप्शन यूजरला दिसेल. ॲपल युजरला बनावट हेडफोन वापरण्यापासून रोखणार नाही. म्हणजेच ॲपलने ते हेडफोन बनावट असल्याचा मॅसेज दिला की ते हेडफोन वापरायचे की नाही हा त्या युजरचा निर्णय असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.