iPhone Buying Tips : लाखोंचा iPhone खरेदी करताय? चुटकीसरसी ओळखा मॉडेल रिअल आहे की ड्यूप्लिकेट,सोपी ट्रिक बघाच

Tips to Identify a Genuine Real iPhone : हल्ली आयफोनचे बनावट मॉडेल्स मार्केटमध्ये आले आहेत. त्यामुळे लाखो रुपये देऊन आयफोन खरेदी करण्यापूर्वी तो रियल मॉडेल आहे की नकली आहे हे तपासण्याच्या काही सोप्या ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
tips to verify iphone real or fake
tips to verify iphone real or fakeesakal
Updated on

iPhone Tips : आपल्या सर्वांना माहिती आहेच, नुकतंच Apple ने भारतासह जगभर आपली नवीन iPhone 16 सिरीज लाँच केली. या लाँचसोबतच काही जुने iPhone बंद करण्यात आले आहेत. त्यासोबतच iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 14 आणि iPhone 14 Plus यांच्या किंमतीत 10,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या किंमतीच्या सूट मिळत असल्यामुळे अनेक जणांना नवीन iPhone घेण्याचा विचार तर येतोच आहे.

पण यासोबतच बाजारात असलेल्या नकली iPhone ची चिंताही वाढते. कारण, मूळ iPhone इतक्या हुबेहूब दिसणाऱ्या नकली iPhone ची प्रकरणं वाढली आहेत. म्हणूनच, आपण लाखो रुपये देऊन खरेदी करत असलेला iPhone नकली आहे की खरा, हे कसं ओळखायचं याच्या सोप्या ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

tips to verify iphone real or fake
Apple iPhone Discontinue : ॲपल युजर्सना धक्का! iPhone 16 लाँच झाला अन् कंपनीने बंद केले 3 लोकप्रिय आयफोन मॉडेल्स,कारण जाणून सगळे शॉक

नकली iPhone ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स

IMEI नंबर तपासा: प्रत्येक खऱ्या iPhone मध्ये IMEI नंबर असतो. हा नंबर शोधण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा, नंतर जनरल निवडा, तिथे अबाउटवरवर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करा. इथे तुम्हाला IMEI नंबर दिसेल. जर IMEI किंवा सीरियल नंबर नसले, तर तो iPhone नक्ली असण्याची शक्यता जास्त असते.

ऑपरेटिंग सिस्टीम तपासा: iPhone मध्ये iOS हे ऑपरेटिंग सिस्टीम असते, जे Android पेक्षा वेगळं आहे. तुमच्या फोनमध्ये कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते तपासण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा आणि नंतर सॉफ्टवेअर टॅब निवडा. खऱ्या iPhone मध्ये Safari, Health आणि iMovie सारखे अॅप्स असतील.

tips to verify iphone real or fake
iPhone 16 Price : आला आला आयफोन 16, धमाकेदार फीचर पण भारतात किंमत किती?

फोन कसा दिसतो : नकली iPhone ची बांधणी स्वस्त मालापासून केलेली असते आणि त्यांचं डिझाईनही मूळ iPhone पेक्षा वेगळं असतं. विशेषत: नॉच, फ्रेम आणि कॅमेरा मॉड्यूल यांची माहिती घ्या. मूळ iPhone मध्ये बहुतेक नवीन मॉडेल्स धातू आणि काचेपासून बनलेले असतात आणि त्यामुळे त्यांना एक प्रीमियम लुक असतो.

सेटिंग्ज नीट तपासा: तुमच्या iPhone ची सॉफ्टवेअर माहिती, IMEI नंबर, स्टोरेज क्षमता आणि इतर सेटिंग्ज नीट तपासा. या सर्व गोष्टींवरून तुमच्या iPhone ची खरेदी खात्री केली जाऊ शकते. पूर्ण खात्रीसाठी जवळच्या Apple स्टोअरमध्ये जाऊन फोन तपासून घेणं उत्तम.

या टिप्समुळे तुम्ही आयफोन खरेदी करताना खऱ्या ब्रँडचा फोन खरेदी करू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.