नागपूर : कितीही महागडा फोन असू द्या, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये काहीतरी समस्या असल्याचं आपण बर्याच वेळा पाहिलं आहे. यापैकी एक समस्या म्हणजे स्मार्टफोनची व्हॉइस क्वॉलिटी ब्रेक (smartphone audio problem) होणे. कधीकधी ही समस्या वाढते. अशा परिस्थितीत यूजर्स अस्वस्थ होऊ लागतात आणि सर्विस सेंटरमध्ये जातात. मात्र आता चिंता करू नका तुम्ही घरबसल्याच तुमच्या मोबाईलची (Android smartphone) व्हॉइस क्वॉलिटी चांगली करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स (smartphone tips) देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. (how to improve voice quality in android smartphone for free try these useful tricks)
जर तुमच्या स्मार्टफोनचा आवाज अगदीच कमी झाला असेल तर हि तुमच्या मायक्रोफोनची किंवा स्पिकर्सची संख्या असू शकते. तुमच्या फोनमध्ये कचरा जमा झाला असेल तर ही समस्या उदभवू शकते. यासाठी तुम्हाला स्पिकर्स साफ करण्याची गरज पडेल. यासाठी अगदी सॉफ्ट टूथब्रश घ्या आणि स्पिकर्स साफ करा. यामुळे पुन्हा व्हॉइस क्वॉलिटी चांगली मिळेल.
आजकाल, प्रत्येक अँड्रॉइड फोनमध्ये HD कॉलिंगची सुविधा आहे. याला HD व्हॉइस कॉलिंग किंवा VoLTE म्हणतात. ते चालू करून कॉलिंगची व्हॉइस क्वॉलिटी सुधारते. जर आपण एखादा जुना फोन वापरत असाल तर आपल्याला आपल्या ऑपरेटरशी संपर्क साधून हे फिचर ऑन करण्यासंबंधी विचारणा करावी लागेल. तसंच फोनमधील Advance Calling फिचर ऑन करावं लागेल.
जेव्हा सिग्नल वीक होतो तेव्हा आपण WIFI कॉलिंग पर्याय चालू करू शकतो. weak नेटवर्कमध्ये कॉल करण्यात आवाज स्पष्ट येत नाही. मात्र हे फिचर व्हॉईस क्वॉलिटी सुधारते आणि यात कोणत्याही प्रकारचे इको येत नाही. जर नेटवर्क वीक असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कॉलिंग दरम्यान अजूनही आपल्याला स्पष्ट आवाज न मिळाल्यास आपण कॉल करण्यासाठी Google Duo, WhatsApp, Messenger वापरू शकता.
(how to improve voice quality in android smartphone for free try these useful tricks)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.