घरबसल्या करा आधार-मतदार कार्ड लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar-Voter Card link: निवडणूक कायदे (सुधारणा) विधेयक, 2021 मध्ये आधारकार्डला मतदार कार्डशी लिंक करण्याची तरतूद आहे.
Aadhaar-Voter Card link
Aadhaar-Voter Card linkEsakal
Updated on

आधारकार्ड-मतदानकार्ड लिंक (Aadhaar-Voter Card Link):

केंद्र सरकारने संसदेत सादर केलेले निवडणूक कायदे (सुधारणा) विधेयक, 2021 लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. मात्र, काँग्रेस, बसपासह विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. विधेयकात आधारकार्डला मतदार कार्डशी लिंक (Aadhaar-Voter Card linking) करण्याची तरतूद आहे. कायदा झाल्यानंतर मतदार यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आधार कार्ड मागण्याचा अधिकार असेल. मात्र, सध्या या विधेयकात आधार कार्डचा क्रमांक देणे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे, म्हणजेच ते आता बंधनकारक असणार नाही.

निवडणुकीत बनावट मतदानाच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत, असे मोदी सरकारचे म्हणणे आहे. मतदार ओळखपत्राशी आधार लिंक केल्यास बोगस मतदान रोखण्यास मदत होईल. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यास परवानगी दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मतदार कार्ड आधारशी लिंक करणे खूप सोपे आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन प्रक्रियेशी लिंक करू शकता.

Aadhaar-Voter Card link
मतदान ओळखपत्राला 'आधार' देण्याचे विधेयक राज्यसभेतही मंजूर

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड कसे लिंक करायचे ते जाणून घेऊया (How to link voter ID card and Aadhar card)

1. सर्व प्रथम https://voteportal.eci.gov.in वर जा.

2. यानंतर मोबाईल क्रमांक / ईमेल / मतदार आयडी क्रमांक (Mobile no/ email / Voter ID No) आणि पासवर्डसह लॉगिन करा.

3. यानंतर तुमचं राज्य, जिल्हा तसेच आवश्यक माहिती भरा.

4. सर्व माहिती भरल्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा. सरकारी आकडेवारीशी तुमची माहिती जुळली तर एक नवीन तपशील तुमच्यासमोर उघडेल.

5. आता तुम्हाला येथे फीड आधार क्रमांकावर (Feed Aadhar Number) क्लिक करावे लागेल.

6. आधारसोबतच इतर माहिती भरा.

7. सर्व माहिती तपासल्यानंतर सबमिट बटण दाबा.

- तुमची नोंदणी यशस्वी झाली हे स्क्रीनवर येईल.

Aadhaar-Voter Card link
मतदान कार्ड अन् आधारबाबत केंद्राचा नवा निर्णय

एसएमएसद्वारे मतदानकार्ड आधारशी लिंक कसं करायचं? (How to link voting card to Aadhaar via SMS?)

आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, एसएमएसद्वारे 166 किंवा 51969 वर <Voter ID No> आणि <Aadhaar Number> पाठवा.

कॉलद्वारे मतदानकार्ड आधारशी लिंक करा (Link to Voting Card Aadhaar by Call)-

एक फोन कॉलद्वारे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड देखील लिंक करू शकतात. यासाठी तुम्हाला सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत 1950 वर कॉल करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.