Loan Repayment online: सध्याच्या डिजिटल युगात पैशांचा व्यवहार करणं अगदी सोप झालं आहे. तुमच्या हातातील फोन हीच तुमची बँक आणि तुमचं वॉलेट आहे. फोनमधील विविध अॅप्सच्या मदतीने तुम्ही पैशांचे व्यवहार करू शकता.
डिजिटल पेमेंटसाठी Digital Payment पेटीएम, गुगल पे आणि फोनपे या अॅप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. सामान्यांपासून ते अगदी दुकानदार आणि बिझनेसमन सगळ्यांना अगदी सुरळीत आणि सोप्या पद्धतीने पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. How to pay EMI Through PhonePe Digital Payment App
एखाद्याला पैसे ट्रान्सफर करण्यापासून ते रिचार्ज, विजबील तसंच इतर महत्वाची बिलं, वीमा आणि म्युचअल फंड Mutual Fund हे सगळं डिजिटल पेमेंट करणं शक्य झालं आहे.
यात आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही फोनपे युजर असाल तर तुम्ही तुमच्या लोनचे ईएमआई EMI आणि पेमेंटही फोनपेवरून करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
फोनपेवरून EMI भरणं सोयीस्कर झाल्याने बँकेत तासन घालवायचा वेळ वाचणार आहे. फोनपे अॅपवरील काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही अगदी कमी वेळेत लोनचे हप्ते भरू शकता.
हे देखिल वाचा-
PhonePe वरून असा भरा EMI
सर्वप्रथम फोनपे अॅप सुरू करा. त्यानंतर होमपेजवरील रिचार्ज अॅण्ड बिल पे (Recharge and pay bill) या ऑप्शनमध्ये जा.
त्यानंतर फायनॅनशियल सर्विसेस आणि टॅक्स या पर्यायाखाली असलेल्या लोन रिपेमेंट (lone repayment) या पर्यायावर क्लिक करा.
दुसऱ्या टप्प्यात तुमचा लोन बिलर निवडा म्हणजेच तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलंय ती निवडा.
बँक निवडल्यानंतर तुमचा लोन अकाऊंट नंबर टाकून कन्फर्म करा.
त्यानंतर पेमेंट मोड सिलेक्ट करून पेमेंट पूर्ण करा.
या सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही अगदी कमी वेळेत लोनचं EMI भरू शकता.
फोनपे हे भारतातील विश्वसनिय डिजिटल पेमेंट अॅपपैकी एक अॅप असून अनेक भारतीय या अॅपचा वापर रोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात करतात. या अॅपवरून तुम्ही लोन EMI प्रमाणेच क्रेडिट कार्डच्या बिलाचंही पेमेंट करू शकता.
यासाठी देखील अगदी सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही बिल भरू शकता. यासोबतच कार, बाईक तसचं विविध इन्शुरन्सचं पेमेंट करू शकता.
डिजिटल पेमेंटमुळे अलिकडे बँकेत जाऊन व्यवहार करण्यासाठी लागणारा वेळ वाचला आहे. एवढंच काय तर आता एटीएमच्या रांगेत उभं राहणंही फारस गरजेचं नाही. या कॅशलेस सुविधांमुळे पैसे बाळगण्याचा ताण कमी झालाय.
शिवाय व्यवहारांचे सर्व रेकॉर्डही राहत असल्याने पैशांचा हिशोबही ठेवता येतो. फोनपे डिजिटल पेमेंट हा पैशांचा व्यवहार करण्यासाठीचा एक सुरक्षित आणि सोपा पर्याय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.