Recover Hacked Insta ID : हॅक झालेलं इन्स्टा अकाउंट कसं मिळवायचा परत? कंपनीच्या मेलकडे करू नका दुर्लक्ष

Instagram Account : तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर कंपनी तुम्हाला इमेलच्या माध्यमातून इशारा पाठवतं. अकाउंट सिक्युरिटीबाबत आलेल्या या मेलकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं.
Recover Hacked Insta Account
Recover Hacked Insta AccounteSakal
Updated on

How to Recover Hacked Instagram Account : सध्या कित्येक जणांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होत असलेले दिसून येतंय. हॅक करण्यात आलेल्या इन्स्टा हँडल्सवरुन क्रिप्टो किंवा बिटकॉइनमध्ये कोट्यवधींची कमाई केल्याचं सांगण्यात येतं. जवळच्या व्यक्तीच्या अशा पोस्ट पाहून इतर लोकही हॅकर्सच्या जाळ्यात अडकत आहेत. यामुळे हॅक झालेलं आयडी त्वरीत रिकव्हर करुन घेणं गरजेचं आहे.

तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर कंपनी तुम्हाला इमेलच्या माध्यमातून इशारा पाठवतं. अकाउंट सिक्युरिटीबाबत आलेल्या या मेलकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटीबाबत तुम्हाला सांगण्यासाठी हा मेल पाठवण्यात येतो. यावर तातडीने कारवाई केल्यास तुम्ही हॅक झालेलं इन्स्टा अकाउंट रिकव्हर करू शकता.

Recover Hacked Insta Account
WhatsApp Fact Check Helpline : डीपफेकला बसणार आळा! MCA आणि मेटा मिळून सुरू करणार 'व्हॉट्सअ‍ॅप फॅक्ट-चेक हेल्पलाईन'

अशा प्रकारे करा रिकव्हर

  • हॅक झालेलं इन्स्टा आयडी रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी लॉग-इन पेजवर यावं लागेल.

  • तुम्ही जर अँड्रॉईड फोन वापरत असाल, तर Get Help Logging-in या पर्यायावर क्लिक करा. जर आयफोन वापरत असाल तर Forgot Password या पर्यायावर क्लिक करा.

  • याठिकाणी तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी आणि नाव सांगावं लागेल.

  • जर तुमच्याकडे अकाउंटला लिंक असलेला मेल आयडी किंवा मोबाईल नंबर नसेल, तर सगळ्यात शेवटी वापरलेली लॉग-इन इन्फॉर्मेशन एंटर करा.

  • यानंतर Can't reset Your Password हा पर्याय निवडा. यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या सूचना फॉलो करा.

  • यानंतर तुमचा ई-मेल आयडी किंवा फोन नंबर यांपैकी एक पर्याय निवडा.

  • यानंतर मेल किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला एक लॉग-इन लिंक मिळेल. या लिंकवर क्लिक करुन दिलेल्या सूचना फॉलो करा.

सिक्युरिटी कोड मिळवा

  • जर तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकत नसाल, आणि वरील टप्पे पूर्ण होत नसतील; तर आणखी एका पद्धतीने अकाउंट रिकव्हर करता येईल.

  • यासाठी तुम्हाला Need More Help या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

  • यानंतर ई-मेल आयडी किंवा फोन नंबर यांपैकी एक गोष्ट निवडा आणि Send Security Code या पर्यायावर क्लिक करा.

  • तुमच्याकडे जर तो ई-मेल किंवा फोन नंबर नसेल, किंवा तुम्हाला सिक्युरिटी कोड आला नाही, तर I Can't access this email or phone number या पर्यायवर क्लिक करा.

  • यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचना फॉलो करून तुम्ही आपलं अकाउंट रिकव्हर करू शकता.

Recover Hacked Insta Account
Smart Toothbrush Hacked : 'स्मार्ट टूथब्रश'देखील होऊ शकतात हॅक? व्हायरल बातमीमधील दाव्यात किती आहे तथ्य?

व्हेरिफिकेशन

काही वेळा रिकव्हर केलेलं अकाउंट वापरण्यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी तुम्हाला स्वतःचा फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करावा लागेल. याची गरज भासल्यास इन्स्टाग्राम याबाबत तुम्हाला सूचना देईल. त्यानुसार तुम्ही आपलं अकाउंट व्हेरिफाय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.