TV Remote : खराब रिमोटला फटके देणं थांबवा! दोन मिनिटात करता येईल नीट, वापरा ही ट्रिक

रिमोट जेव्हा काम करत नाही, तेव्हा त्याला जोराजोरात फटके देण्याची सवय जवळपास सर्वांनाच असते.
TV Remote repair
TV Remote repaireSakal
Updated on

आजकाल प्रत्येक घरांमध्ये कित्येक इलेक्ट्रिक उपकरणं असतात. यातील टीव्ही आणि एसीसारख्या काही उपकरणांना चालवण्यासाठी रिमोटची गरज भासते. हा रिमोट जेव्हा काम करत नाही, तेव्हा त्याला जोराजोरात फटके देण्याची सवय जवळपास सर्वांनाच असते. मात्र, रिमोटवर होत असलेला हा अत्याचार आता तुम्ही थांबवू शकता.

नवीन रिमोटची किंमत २०० ते ४०० रुपयांपासून सुरू होते. दर पाच-सहा महिन्यांनी एवढा खर्च करणं कुणालाच योग्य वाटत नाही. शिवाय टीव्ही, एसी किंवा ब्लूटूथ स्पीकर अशा गोष्टी मॅन्युअली वापरणंही त्रासदायक असतं. त्यामुळेच आम्ही रिमोट दुरूस्त करण्याच्या काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

TV Remote repair
Mileage Tips : किती स्पीडमध्ये कार चालवल्यावर मिळतं बेस्ट मायलेज? जाणून घ्या सोपी ट्रिक

सेल तपासा

रिमोट चालत नाहीये हे लक्षात आलं की त्याला फटके देण्याऐवजी, सगळ्यात आधी त्यातील सेल तपासा. सेल संपले असतील, तर बदलून घ्या. यानंतरही जर रिमोट काम करत नसेल, तर तुम्हाला सेल टाकण्याची जागा तपासावी लागेल.

कार्बन रिमूव्हल

बऱ्याचदा खूप वापरलेल्या रिमोट अचानक काम करायचं बंद करतो. अशा वेळी सेल टाकण्याच्या जागी असलेल्या भागातील मेटल स्प्रिंग आणि प्लेट्स तपासा. याठिकाणी कदाचित कार्बन जमा झालेला असू शकतो, ज्यामुळे बॅटरीची पॉवर रिमोटपर्यंत पोहोचत नाही. या मेटल पार्ट्सना सँडपेपरने घासून घ्या. यामुळे तिथे जमा झालेला कार्बन किंवा गंज निघून जाईल.

TV Remote repair
Ceiling Fan Facts : घराचा Ceiling Fan दिवसभरात किती वीज जाळतो?

आयआर ब्लास्टर

तुम्ही रिमोट जर वेळोवेळी स्वच्छ करत नसाल, तर त्याच्या आयआर ब्लास्टरवर धूळ जमा झाल्याची शक्यता असते. आयआर ब्लास्टर म्हणजे रिमोटच्या पुढच्या बाजूला असलेला छोटासा ट्रान्सपरंट गोल बल्ब. यावर धूळ साचली असल्यामुळे, रिमोटचे सिग्नल तुमच्या अप्लायन्सपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे रिमोट चालत नसला, तर एका स्वच्छ कपड्याने आयआर ब्लास्टर पुसून घ्यावा.

या उपायांनंतरही तुमचा रिमोट काम करत नसेल, तर त्याच्या आतमधील पार्ट खराब झालेला असू शकतो. अशा वेळी तो दुकानातून रिपेअर करून घेणं किंवा बदलून घेणं हेच पर्याय उरतात.

TV Remote repair
Sony BRAVIA X80L : Sony ने लॉन्च केले नवीन स्मार्ट TV, गेमिंगसाठी मिळणार PS5 सपोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.