UPI Pin Change : युपीआय पिन बदलणे झाले सोप्पे! पटकन फॉलो करा 'या' स्टेप्स

BHIM UPI: सायबर सुरक्षा आता तुमच्या हातात , झटपट बदलू शकता युपीआय पिन
भीम युपीआय वापरून युपीआयचा पासवर्ड बदलू शकता.
भीम युपीआय वापरून युपीआयचा पासवर्ड बदलू शकता. esakal
Updated on

Online Payment : यूपीआय (Unified Payments Interface) ने बँकांमध्ये पैसे पाठवण्याची पद्धत (Transaction) बदलून टाकली आहे. आता तुम्ही अगदी सोप्या आणि जलद मार्गाने पैसे पाठवू शकता. पण, यासोबतच तुमच्या पैशाची सुरक्षा महत्वाची आहे. तुमचा यूपीआय पिन तुमची गुप्त माहिती आहे जी तुमच्या पैशाला अनधिकृत व्यवहारांपासून वाचवते.

वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या काळात तुमची आर्थिक माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्या यूपीआय पिनची (UPI Pin) नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गूगल पे, फोनपे, पेटीएम आणि भीम यूपीआय अशा अनेक लोकप्रिय अॅप्स द्वारे तुम्ही तुमचा यूपीआय पिन सहजतेने बदलू शकता.

भीम युपीआय वापरून युपीआयचा पासवर्ड बदलू शकता.
Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

भीम यूपीआय अॅप वापरून यूपीआय पिन रीसेट करण्यापूर्वीची तयारी:

  • तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक संख्या तुम्हाला माहिती हवेत.

  • तुमच्या डेबिट कार्डची एक्सपायरी डेट (समाप्तीची तारीख) माहिती हवी.

  • तुमचा जो मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असलेला आहे तो सक्रिय आहे याची खात्री करा.

भीम युपीआय वापरून युपीआयचा पासवर्ड बदलू शकता.
Sci-tech : सर्वात स्वस्त QLED

भीम यूपीआय अॅप वापरून यूपीआय पिन रीसेट कसे कराल?

  1. तुमच्या मोबाईलवर भीम यूपीआय अॅप उघडा.

  2. मेन्यूमध्ये जाऊन "बँक अकाउंट" पर्याय निवडा.

  3. "रीसेट यूपीआय पिन" पर्याय शोधा आणि निवडा.

  4. नवीन यूपीआय पिन सेट करण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक आणि त्याची एक्सपायरी डेट (समाप्तीची तारीख) टाका.

  5. तुमच्या बँकेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी (One Time Password) पाठवला जाईल. अॅप या ओटीपीला आपोआप ओळखेल. (Auto Authentication)

  6. तुमचा नवीन यूपीआय पिन टाका. (Create New UPI Password)

  7. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या नवीन यूपीआय पिनची पुष्टी करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.