Scheduled Message On WhatsApp : आता गर्लफ्रेंडला शेड्यूल करून द्या 'बर्थ डे'च्या शुभेच्छा

आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच व्हॉट्सअपने वेडं लावलं आहे.
whatsapp message
whatsapp message Sakal
Updated on

How To Scheduled Message On WhatsApp : आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच व्हॉट्सअ‍ॅपने वेडं लावलं आहे. आज वाढदिवसापासून ते सण उत्सवापर्यंत सर्वांच्या शुभेच्छा व्हॉट्सअपवर मेसेज करून दिल्या जातात.

मात्र, अनेकदा कामाच्या गडबडीत महत्त्वाच्या व्यक्तीला मेसेज करणं किंवा वाढदिवसांच्या शुभेच्छा देणं राहून जातं. यामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते. परंतु, आता व्हॉट्सअपवर तुम्ही तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस किंवा इतर सणांच्या शुभेच्छांसह इतर मेसेज शेड्यूल करू शकणार आहात.

Facebook आणि Twitter वरदेखील पोस्ट किंवा मेसेज शेड्यूल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याचप्रमाणे Instagram वर देखील पोस्ट शेड्यूल करण्यात येतात. मात्र, आतापर्यंत व्हॉट्सअपवर अशाप्रकारे मेसेज शेड्यूल करण्याची सेवा देण्यात आलेली नाही.

पण, काही थर्ड पार्ट अ‍ॅपच्या मदतीने आता यूजर व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज शेड्यूल करण्यासाठी फायदेशीर आहे. व्हॉट्सअपवर मेसेज शेड्यूल करण्यासाठी WhatsApp शेड्युलर, डू इट लेटर, SKEDit यासारखे थर्ड पार्टी अ‍ॅप्स मदतगार आहेत. यावर यूजर मेसेजसह व्हिडिओदेखील शेड्यूल केले जाऊ शकतात.

कुठून करता येतील थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड

व्हॉट्सअपवर व्हिडिओ किंवा मेसेज शेड्यूल करण्यासाठी Google Play Store वर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यावरून तुम्ही SKEDit किंवा WhatsApp शेड्युलर, डू इट लेटर यापैकी एकाची निवड करू शकता.

कसे कराल whatsapp वर मेसेज शेड्यूल?

  • सर्वप्रथम Play Store/App Store वर जा आणि SKEDit शोधा.

  • सर्वात पहिले वरीलपैकी कोणतेही एक अ‍ॅप डाउनलोड करा. त्यानंर Facebook द्वारे साइनइन करा किंवा नवीन अकाउंट तयार करा.

  • यानंतर तुमचे नाव, ईमेल आणि पासवर्ड टाकून 'Create Account' वर क्लिक करा.

  • वरील स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या ईमेलवर एक कोड येईल तो टाकून तुमचा ईमेल आयडी व्हेरिफाय करा.

  • व्हेरिफीकेशननंतर तुम्हाला अ‍ॅड सर्व्हिस पेज दिसेल, तेथे व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करा.

  • SKEDit साठी accessibility permission वर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी मेसेज शेड्यूल करायचा आहे तो WhatsApp संपर्क निवडा. सर्व तपशील, तारखा, वेळ आणि वेळापत्रक टाका. तुम्ही टाकलेला मेसेज शेड्यूल केलेल्या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत सहज पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.