UPI Payment: UPI पेमेंटच्या संभाव्य धोक्यांपासून वाचायचं आहे? मग ही माहिती आधीच वाचा

यूपीआय (UPI Fraud)शी संबंधित फसवणूक समोर येऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांनी UPI पेमेंट करताना....
UPI Payment
UPI Paymentesakal
Updated on

UPI Payment : गेल्या काही वर्षांत देशात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. UPI गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे डिजिटल पेमेंट मोड ठरले आहे. लॉकडाउन नंतर तर आता सगळेच ऑनलाइन पेमेंट करता आहेत, कारण, घरी बसून UPI ​​मधून पैसे ट्रान्सफर करणे क्षणार्धात होते. अशा परिस्थितीत यूपीआय (UPI Fraud)शी संबंधित फसवणूक समोर येऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांनी UPI पेमेंट करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

UPI म्हणजे काय आणि त्याचे फायदे

UPI म्हणजे रिअल टाइम पेमेंट सिस्टम. ज्याच्या मदतीने तुम्हाला एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. त्याची खास गोष्ट म्हणजे UPI च्या माध्यमातून तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही पैसे ट्रान्सफर करु शकता.

UPI Payment
UPI Pin Change : Debit Card शिवाय UPI पिन कसा बदलायचा?

पैसे ट्रान्सफर करण्याची UPI प्रणाली कशी कार्य करते?

UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे आहे. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे (Phone Pe), पेटीएम (Paytm), गुगल पे (Google Pay), भीम (Bheem) इत्यादीसारखे यूपीआय अॅप असावे, ज्याला यूपीआय अॅप तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही ते वापरू शकता. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकाधिक UPI अॅप्सशी लिंक करु शकता. त्याच वेळी, अनेक बँक खाती UPI अॅपद्वारे देखील ऑपरेट केली जाऊ शकतात.

UPI Payment
Online Payment: UPI वरून चुकीच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले पैसे? रिफंडसाठी फॉलो करा ही प्रोसेस

RBI चे UPI 123 पे

विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला मनी ट्रान्सफरची सुविधा देते. हजारो फोन वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये आणण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI, UPI 123 Pay ची नवीन आवृत्ती सादर केली आहे.

UPI Payment
Smartphone Theft : मोबाईल चोरी झाल्यास असं थांबवा UPI पेमेंट, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

या मार्गांनी तुम्ही UPI फसवणूक टाळू शकता

कोणत्याही अनोळखी मोबाइल नंबर आणि वापरकर्त्यांपासून सावध रहा.

UPI द्वारे पैसे मिळवण्याच्या आमिषाने तुमचा UPI पिन शेअर करु नका.

कोणतीही अज्ञात पेमेंट विनंती स्वीकारु नका.

फेक UPI अॅपपासून नेहमी सावध राहा.

कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी ओळख पडताळून पहा.

तुमचा UPI पिन लिहून ठेवू नका किंवा अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करु नका

QR कोडद्वारे पेमेंट करताना तपशीलांची पडताळणी करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()