Instagram Data Tracking : इन्स्टाग्रामला सगळं कळतं तुम्ही इंटरनेटवर काय पाहता; दुसऱ्या अ‍ॅप्सवरही ठेवतं लक्ष! अशा प्रकारे थांबवा ट्रॅकिंग..

Meta : मेटा कंपनी या डेटाचा वापर तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी करतं. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट विषयी इंटरनेटवर सर्च केलं असेल, तर त्यासंबंधी जाहिराती तुम्हाला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर दिसू लागतात.
Instagram Data Tracking
Instagram Data TrackingeSakal
Updated on

How to turn off Instagram Data Tracking : आपण इंटरनेटवर काय-काय सर्च करतो हे खरंतर कोणाला कळू नये अशीच आपली इच्छा असते. मात्र तुमच्या फोनमध्ये जर इन्स्टाग्राम असेल, तर तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करता आणि पाहता हे सगळं मेटा कंपनीकडे सेव्ह राहतं हे लक्षात घ्या.

मेटा कंपनी या डेटाचा वापर तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी करतं. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट विषयी इंटरनेटवर सर्च केलं असेल, तर त्यासंबंधी जाहिराती तुम्हाला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर दिसू लागतात. यासाठी खरंतर इन्स्टाग्राम इन्स्टॉल करतानाच यूजर अग्रीमेंटमध्ये परवानगी मागण्यात येते. मात्र, कित्येक लोक ते न वाचताच 'अग्री' म्हणून सर्व परवानग्या देऊन टाकतात. (Instagram Tracking your Internet Activity)

असं थांबवा ट्रॅकिंग

मेटाने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे, की यूजर्सना अ‍ॅप वापरताना अधिकाधिक पर्सनलाईज्ड आणि चांगला अनुभव यावा यासाठी हे ट्रॅकिंग फीचर देण्यात आलं आहे. अर्थात, तुम्हाला हे बंद देखील करता येतं. अ‍ॅप सेटिंगमध्ये थोडासा बदल करून तुम्ही आपली वेब अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक होण्यापासून थांबवू शकता. (How to Stop Instagram Tracking)

Instagram Data Tracking
Instagram Hidden Game : मेसेजच्या रिप्लायची वाट पाहून कंटाळलात? इन्स्टाग्राम अ‍ॅपवरच खेळू शकता खास गेम; जाणून घ्या कसं

अशी करा सेटिंग

  • यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडावं लागेल.

  • यानंतर स्क्रीनवर सगळ्यात खाली उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या आपल्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा.

  • यानंतर प्रोफाईलवर वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन रेषांवर टॅप करा.

  • यानंतर अकाउंट्स सेंटर (Accounts Center) या पर्यायावर टॅप करा.

  • यानंतर Your Information and Permission या पर्यायावर टॅप करा.

  • यानंतर येणाऱ्या पर्यायांमध्ये Your Acactivity off Meta Technologies या पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर Manage Future Activity या पर्यायावर टॅप करा.

  • याठिकाणी Connect Future Activity आणि Disconnect Future Activity हे दोन पर्याय दिसतील. यातील डिस्कनेक्ट पर्याय निवडून तुम्ही इन्स्टाग्राम ट्रॅकिंग बंद करू शकता.

Instagram Data Tracking
Instagram Chat Features: इन्स्टाग्रामने लाँच केले दोन नवे चॅट फीचर्स; मेसेज करता येणार एडिट अन् पिन.. जाणून घ्या!

आधीचा डेटा करा डिलीट

  • इन्स्टाग्रामने ट्रॅक केलेला डेटा डिलीट करण्याचा पर्यायही याठिकाणी उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला वरील स्टेप्स फॉलो करुन Your Activity Off Meta Technologies या मेन्यूपर्यंत जायचं आहे.

  • याठिकाणी तुम्हाला तुमची रीसेंट अ‍ॅक्टिव्हिटी दिसेल. तुम्ही इंटरनेटवर काय सर्च केलं होतं, किंवा याआधी कोणतं अ‍ॅप उघडलं होतं हेदेखील यामध्ये दिसेल.

  • याठिकाणी तुम्ही आधी सर्च केलेली अ‍ॅक्टिव्हिटी डिलीट देखील करू शकता. यासाठी Clear Previous Activity यावर टॅप करावं लागेल.

  • तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामची अ‍ॅक्टिव्हिटी एकत्र डिलीट करू शकता.

Instagram Data Tracking
Recover Hacked Insta ID : हॅक झालेलं इन्स्टा अकाउंट कसं मिळवायचा परत? कंपनीच्या मेलकडे करू नका दुर्लक्ष

याशिवाय तुम्ही एखादी ठराविक अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक होण्यापासून देखील थांबवू शकता. यासाठी तुम्हाला Disconnect Specific Activity या पर्यायावर टॅप करायचं आहे. यानंतर तुम्हाला पासवर्ड एंटर करावा लागेल. त्यानंतर येणाऱ्या मेन्यूमधून तुम्ही ठराविक अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक होण्यापासून थांबवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()