Google Gemini Tricks : आता यूट्यूब व्हिडिओ पाहून नोट्स बनवून देईल 'जेमिनी'; कसा करायचा या एआय फीचरचा वापर?

YouTube Video Summary : यूट्यूबवर कित्येक विषयांमधील तज्ज्ञांचे भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत. मात्र, यातील कित्येक व्हिडिओ हे एक तास किंवा त्याहून मोठे आहेत.
Google Gemini Tricks
Google Gemini TrickseSakal
Updated on

Google Gemini for YouTube Video Summary : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे आपल्याला भरपूर फायदे होत आहेत. चॅटजीपीटी आणि त्यासारख्याच इतर चॅटबॉट्समुळे आपली कितीतरी कामं सोपी झाली आहेत. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या गुगलच्या 'जेमिनी' एआयमध्येही असे बरेच फीचर्स आहेत, जे आपल्या कामी येतील. यातील एका फीचरची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

यूट्यूब व्हिडिओ समरी

आपल्यापैकी बरेच जण अभ्यासासाठी यूट्यूबचा वापर करतात. यूट्यूबवर कित्येक विषयांमधील तज्ज्ञांचे भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत. मात्र, यातील कित्येक व्हिडिओ हे एक तास किंवा त्याहून मोठे आहेत. त्यामुळे हे संपूर्ण व्हिडिओ पाहत बसण्यात बराच वेळ जाऊ शकतो. मात्र, जेमिनी एआयमुळे आता हा वेळ वाचणार आहे.

गुगलच्या जेमिनी एआय चॅटबॉटवर यूट्यूबच्या व्हिडिओची समरी मिळवण्याचं खास फीचर उपलब्ध आहे. यासाठीची प्रक्रिया देखील अगदी सोपी आहे. यामुळे मोठ्या यूट्यूब व्हिडिओंमधील मुख्य पॉइंट्स तुम्हाला एका क्लिकवर लिहून मिळतील.

Google Gemini Tricks
OpenAI Sora : ना वाद्य, ना कॅमेरा, ना शूटिंग.. केवळ टेक्स्ट वाचून एआयने तयार केला म्युझिक व्हिडिओ; पोस्ट करताच झाला व्हायरल

अशी मिळवा समरी

  • यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी यूट्यूबवर जावं लागेल.

  • यानंतर तुम्हाला ज्या व्हिडिओची समरी हवी आहे, तो व्हिडिओ प्ले करा.

  • यानंतर त्या व्हिडिओची यूआरएल कॉपी करा.

  • ही कॉपी केलेली लिंक गुगलच्या जेमिनी चॅटबॉटमध्ये पेस्ट करा. सोबतच 'Summaries this video' अशी कमांडही तुम्हाला टाईप करावी लागेल.

  • यानंतर त्या व्हिडिओची समरी तुम्हाला खाली मिळेल.

परिपूर्ण नाही फीचर

  • गुगलने हे स्पष्ट केलं आहे, की हे फीचर अद्याप परिपूर्ण नाही.

  • ज्या व्हिडिओंना कॅप्शन्स ऑन आहेत, त्याच व्हिडिओंची समरी करण्यास जेमिनी सक्षम असेल.

  • तुम्ही ज्या भाषेत कमांड देत आहात, त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा रिस्पॉन्स मिळू शकतो.

  • जेमिनीने दिलेली माहिती पूर्णपणे अचूक असेल असं नाही, त्यामध्ये काही त्रुटी आढळू शकतात.

Google Gemini Tricks
Fashion Chatbot : ऑनलाईन शॉपिंगला मदत करेल एआय चॅटबॉट; कपड्यांपासून अ‍ॅक्सेसरीजपर्यंत देईल उत्तम सल्ले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.