iPhone Data Transfer : आयफोन घेण्याचा विचार करताय? मिनिटांत अँन्ड्रॉईडमधून ॲपलमध्ये ट्रांसफर करा डेटा,वाचा सोपी ट्रिक

Android to iPhone data transfer tips : अँन्ड्रॉईड वापरकर्त्यांनी आयफोन घेतल्यास त्या फोन मधील डेटा आयफोनमध्ये ट्रान्सफर करायचं याबद्दलच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Android mobile to iPhone data transfer
Android mobile to iPhone data transfer tips esakal
Updated on

Andoid Smartphone to iPhone Data Transfer : आपला Android मोबाईल सोडून iPhone 16 घेण्याचा विचार करताय? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Apple ची नवीन iPhone 16 सिरीज मार्केटमध्ये आली आहे आणि अनेक Android वापरकर्ते आता iPhone वापरण्याचा विचार करत आहेत. काल मुंबई आणि दिल्लीच्या अॅपल स्टोअर्समध्ये आयफोन 16 खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. पण प्रश्न आहे आहे की अँन्ड्रॉईड वापरकर्त्यांनी आयफोन घेतल्यास त्या फोन मधील डेटा आयफोनमध्ये कसे घ्याल.

चिंता कशाला? Apple ने खास 'Move to iOS' नावाचे app बनवलं आहे जे तुमच्या Android फोनमधील data नवीन iPhone वर सहजतेने ट्रांसफर करण्यात मदत करते.(Android to iPhone data transfer)

फोटो, कॉनटॅक्ट नंबर, मेसेज आणि बरेच काही ट्रांसफर करता येईल. हे सर्व काही wireless द्वारे नवीन iPhone वर पाठवता येईल. चला तर मग Android वरून iPhone वर स्विच करण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स जाणून घेऊया.

Android mobile to iPhone data transfer
Big Billion Days : खुशखबर! नथिंग 5G फोन मिळतोय 12,999 रुपयांत; एकदम ब्रँड फीचर्सच्या स्मार्टफोनवर महा डिस्काऊंट

सुरु करण्याआधी (Before Starting)

तुमच्या Android फोनवर लेटेस्ट Android version असून Wi-Fi चा चालू असेल याची खात्री करा. तसेच तुमच्या नवीन iPhone वर देखील iOS ची लेटेस्ट version असावी.

ट्रांसफर सुरू करण्यापूर्वी दोन्ही फोन चार्जरला लावून ठेवा. तुमच्या Android फोनमधील सर्व डाटा नवीन iPhone मध्ये मावेल याची खात्री करा. जास्त डाटा असल्यास काही फाईल्स डिलीट करा किंवा cloud मध्ये ठेवा.

डाटा ट्रांसफर करणे (Transferring Data)

तुमच्या Android फोनवर Google Play Store वर जा आणि "Move to iOS" app शोधा. ते डाउनलोड आणि इनस्टॉल करा.

तुमचा नवीन iPhone चालू करा आणि सुरुवातीची setup सुरू करा. "Apps & Data" स्क्रीनवर येताना "Move Data from Android" निवडा.

तुमच्या Android फोनवर Move to iOS app उघडा आणि "Continue" वर टॅप करा. दोन्ही फोन चार्जरला लावलेले असून जवळपास असल्याची खात्री करा.

Android mobile to iPhone data transfer
iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

तुमच्या iPhone वर एक वेळेस वापरता येणारा सहा किंवा दहा अंकी कोड दिसेल. हा कोड तुमच्या Android फोनवर टाका.

तुमच्या iPhone द्वारे एक temporary Wi-Fi network तयार केले जाईल. Android फोनवर या नेटवर्कवर कनेक्ट व्हा आणि ट्रांसफर स्क्रीन येण्याची वाट पहा.

तुमच्या Android फोनवर तुम्ही contacts, messages, photos, videos इत्यादी data types निवडू शकता. कोणते डाटा पाठवायचे ते निवडून "Next" वर टॅप करा आणि ट्रांसफर सुरू होईल. डाटा मोठा असल्यास थोडा वेळ लागू शकतो. ट्रांसफर पूर्ण होईपर्यंत दोन्ही फोन untouched ठेवा.

आता तुम्ही Android वरून सहजतेने iPhone वर स्विच करू शकता आणि तुमचा महत्वाचा डेटा सुरक्षितपणे ट्रान्सफर करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.