Android फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे चालू करावे? वाय-फाय कॉलिंगचे फायदे काय?

Android फोनमध्ये वायफाय कॉलिंग कसे चालू आणि बंद कराल ? जाणून घ्या सविस्तर
How to Enable Wi-Fi Calling in Android Phone
How to Enable Wi-Fi Calling in Android PhoneEsakal
Updated on

आजकाल लोक ऑफिस आणि घरात दोन्ही ठिकाणी वाय-फाय वापरत आहेत. वाय-फाय इंटरनेट हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर वाय-फाय कॉलिंगचे नाव तुम्ही ऐकले असेलच.

वाय-फाय कॉलिंग आता खूप सामान्य झाले आहे. तुम्हाला ते सर्व स्मार्टफोनमध्ये मिळेल. बरेच लोक वाय-फाय कॉलिंग फीचर आरामात वापरत आहेत पण अनेकांना याची कल्पना नाही. आज आम्ही तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कॉलिंग कसे चालू करायचे ते सांगणार आहोत...

वाय-फाय कॉलिंगचे फायदे?

वाय-फाय कॉलिंग हे स्लो नेटवर्क परिस्थितीमध्ये अतिशय उपयुक्त फीचर असल्याचे सिद्ध होते. वाय-फाय कॉलिंगमध्ये तुम्ही हाय क्वालिटी ऑडिओमध्ये बोलू शकता. याशिवाय नेटवर्क नसेल किंवा स्लो नेटवर्क असेल तर खूप मदत होते. तुम्ही नेटवर्क नसलेल्या ठिकाणी असाल तर तुम्ही वाय-फाय कॉलिंग फीचरचा लाभ घेऊ शकता.

How to Enable Wi-Fi Calling in Android Phone
Online Gaming : 12GB रॅम अन् 6000 mAh बॅटरी.. आसुसच्या तगड्या गेमिंग स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 30 हजारांची सूट!

फोनमध्ये वाय-फाय कॉलिंग फीचर कसे चालू करावे?

सर्व प्रथम, तुमचा Android फोन वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करा.

आता फोन सेटिंग्ज वर जा. तुम्ही कॉल आयकॉनसह अॅपच्या वरच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या तीन ठिपक्यांवर देखील क्लिक करू शकता.

यानंतर सेटिंगचा पर्याय येईल.

सेटिंग्ज Wi-Fi कॉलिंग ऑप्शन दिसेल.

त्याचे वाय-फाय कॉलिंग चालू करा.

आता हा पर्याय तुमच्या नोटिफिकेशन टॉगलमध्ये देखील दिसेल ज्यामध्ये नेट, टॉर्च इत्यादी बंद करण्याचा पर्याय दिसत आहे.

यानंतर, जेव्हाही तुम्ही कॉल कराल आणि वाय-फाय नेटवर्क झोनमध्ये असाल तेव्हा हे फीचर काम करेल आणि तुम्ही चांगले बोलू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.