Smartphone TV Remote : टीव्हीचा रिमोट बंद पडलाय? चिंता कशाला, तुमच्या स्मार्टफोनला बनवा पर्सनल रिमोट, पटकन करा अगदी सोपी ट्रिक..

android iphone tv remote tips : तुमच्या हातात असलेला स्मार्टफोनच तुमचा टीव्ही रिमोट बनू शकतो.आम्ही तुम्हाला एकदम सोपी आणि स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईल फोनला टीव्हीचा रिमोट बनवून आरामात टीव्ही पाहू शकता.
how to use google tv app as remote
how to use google tv app as remoteESAKAL
Updated on

Google TV App : कधी रिमोट कुठे गेलाय हेच कळत नाही? सोफाखाली, अंथरुखाली किंवा लाडक्या लेकांमुळे कुठेतरी लपवून ठेवलेला असतो किंवा कधी कधी अचानक रिमोट बंद पडतो. अश्यात रिमोट नसल्यामुळे टीव्ही चालू करणेही अवघड होऊन जाते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या हातात असलेला स्मार्टफोनच तुमचा टीव्ही रिमोट बनू शकतो.आम्ही तुम्हाला एकदम सोपी आणि स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईल फोनला टीव्हीचा रिमोट बनवून आरामात टीव्ही पाहू शकता.

गुगल टीव्ही अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा ॲन्ड्रॉइड टीव्ही थेट तुमच्या स्मार्टफोनवरूनच चालवू शकतात. म्हणजे चॅनेल बदलणे, आवाज कमी-जास्त करणे, आवडत्या अॅप्स सुरु करणे हे सगळ काही रिमोट दुरुस्त करण्याची किंवा हरवलेला रिमोट शोधून काढण्याची गरज न पडता करता येईल. यात खास म्हणजे ही सुविधा ॲन्ड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर उपलब्ध आहे.

तुमच्या स्मार्टफोनला मिनिटात टीव्ही रिमोट बनवण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या..

how to use google tv app as remote
Smartphone Tips : मोबाईल वापरताना सतत गरम होतोय? पटकन करून घ्या हे काम,नाहीतर होईल मोठे नुकसान

ॲन्ड्रॉइड फोन टीव्ही रिमोट

  • गुगल प्ले स्टोअरवर जा आणि गुगल टीव्ही अॅप डाउनलोड करा.

  • तुमचा टीव्ही आणि फोन एकाच वायफायवर असल्याची खात्री करा. (जर तुमच्या टीव्हीमध्ये वायफाय नसेल तर ब्लूटूथच्या सहाय्यानेही फोन आणि टीव्ही कनेक्ट करता येतात.)

  • गूगल टीव्ही अॅप उघडा.

  • खालच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या 'रिमोट' बटणवर टॅप करा.

  • अॅप तुमच्या आसपासच्या डिव्‍हाइसेस शोधायला सुरुवात करेल. तुमचा टीव्ही दिसल्यानंतर त्याची निवड करा.

  • तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक कोड दिसेल. तोच कोड अॅपमध्ये टाकल्यानंतर 'पेअर' करा.

  • फोन आणि टीव्ही पेअर झाल्यानंतर तुम्ही रिमोटसारखाच फोन वापरून टीव्ही चालवू शकता.

how to use google tv app as remote
PAN-Aadhaar Linking: घरबसल्या एक मेसेज करून पॅनकार्डला आधार लिंक करा,लगेच पाठवा हा SMS

आयफोन टीव्ही रिमोट

  • तुमचा आयफोन आणि टीव्ही एकाच वायफायवर असल्याची खात्री करा.

  • अॅप स्टोअरवरून गुगल टीव्ही अॅप डाउनलोड करा.

  • तुमचा आयफोनवर गूगल टीव्ही अॅप उघडा.

  • स्क्रीनच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या 'टीव्ही रिमोट' आयकॉनवर टॅप करा.

  • अॅप तुमच्या आसपासच्या टीव्ही शोधायला सुरुवात करेल. जर टीव्ही न दिसला तर 'स्कॅन फॉर डिव्‍हाइसेस' बटणवर टॅप करा.

  • तुमचा टीव्ही दिसल्यानंतर त्याची निवड करा आणि टीव्ही स्क्रीनवर दिसणारा 6 अंकी कोड अॅपमध्ये टाका.

  • तुमचा आयफोन आणि टीव्ही पेअर करण्यासाठी 'पेअर' वर टॅप करा.

  • आयफोन आणि टीव्ही पेअर झाल्यानंतर तुम्ही रिमोटसारखाच फोन वापरून टीव्ही चालवू शकता. चॅनेल बदलणे, आवाज कमी-जास्त करणे, प्लेबॅक कंट्रोल करणे इत्यादी अनेक गोष्टी या अॅपच्या सहाय्याने करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.