मास्क घालून तुमचा आयफोन अनलॉक करणे शक्य आहे.
तुमचा आयफोन (iPhone) अनलॉक करण्यासाठी तुम्ही कदाचित फेसआयडीचा (FaceID) वापर मास्कसोबत (Mask) केला असेल. असे काही वेळा घडले आहे की जेव्हा FaceID तुमचा अर्धा झाकलेला चेहरा ओळखत नाही, युजर्सकडे मॅन्युअली स्क्रीन कोड एंटर करण्याचा किंवा तुमचा मास्क खाली खेचण्याचा एकमेव पर्याय राहतो. होय, मास्क घालून तुमचा आयफोन अनलॉक करणे शक्य आहे, परंतु तुमच्याकडे ऍपल (Apple) वॉच असेल तरच.
ऍपल लवकरच येत्या काही दिवसांत iOS 15.4 आणणार आहे, जे आयफोन वापऱ्यांना त्यांचे मास्क घालताना फेस आयडी वापरण्यास सक्षम करेल. iOS 15.4 बीटा, सध्या डेव्हलपर आणि सार्वजनिक बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे, जर तुम्ही मास्क घातला असेल तर FaceID ला Apple Watch शिवाय सुरळीतपणे काम करण्याची अनुमती देते. iOS 15.4 वर चालणाऱ्या iPhone 13 mini वर हे फिचर कसे कार्य करते ते जाणून घेऊयात.
मास्कसह फेस आयडी कसा वापरायचा
सर्वांत पहिल्यांदा जाणून घ्या की, iOS 15.4 अद्याप सामान्य यूजर्ससाठी उपलब्ध नाही. फेस मास्क वापरताना फेस अनलॉक फिचर वापरण्याची क्षमता सध्या बीटामध्ये आहे आणि फक्त iPhone 12 सीरीज आणि iPhone 13 लाइनअपवर अॅक्सेस केला जाऊ शकतो. तुमच्याकडे फेस आयडीसह Apple च्या नवीन आयफोनमध्ये प्रवेश असल्यास, तुम्ही सार्वजनिक बीटा इंस्टॉल करू शकता आणि मास्कसह फेस आयडी वापरण्याचा प्रयत्न करू शकता.
- सर्वात पहिल्यांदा तुमच्या iPhoneच्या Settings अॅप उघडा.
- आता खाली स्क्रोल करा आणि फेस आयडी आणि पासकोड वर या.
- आता तुमचा पासकोड टाका.
- आता मास्कसह फेस आयडी वर टॉगल करा.
- आता Use Face ID with Mask ऑप्शन निवडा.
- आता मास्कसह फेस आयडी सेटअप करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.