घरी बसून अपडेट करा आधार कार्डवरील पत्ता, ही आहे सोपी प्रोसेस

Aadhaar card update online
Aadhaar card update onlineSakal
Updated on

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस बऱ्याचदा आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते, विशेषत: कोविडनंतरच्या काळात तर घराबाहेर पडणे म्हणजे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात टाकणे आहे. आधार अपडेट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला जवळच्या बँक किंवा आधार केंद्रावर जावे लागेल आणि काही शुल्क भरल्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट केले जाते. मात्र, आता UIDAI कडून एक सेल्फ सर्व्हिस पोर्टल सुरु करण्यात आले आहे जे वापरुन आपण घराबाहेर न जाता देखील तुमचा पत्ता अपडेट करू शकतो.

या पोर्टलला सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) असे नाव देण्यात आले आहे जे आधार कार्ड धारकांना आधार केंद्रात न जाता त्यांचे डिटेल्स स्वतः बदलू/अपडेट करण्याची मुभा देते. यासाठी तुम्हाल अत्यल्प म्हणजे 50 रुपये शुल्क द्यावे लागते. आधार कार्डधारकाला पोर्टल सोडते वेळी ही रक्कम भरावी लागेत

ऑनलाइन आधार कार्ड अपडेट कसे करावे

आधार कार्ड अपडेट प्रक्रियेत कार्डधारकाला आवश्यक असलेल्या कागदपत्र ही डिजिटल पद्धतीने स्कॅन केलेल्या स्वरूपात (pdf स्वरूपात) लॉगिन केलेल्या कंप्युटरवर असणे आवश्यक आहे. पत्ता बदलण्यासाठी, एखाद्याला पत्त्याचा पुरावा (PoA) डॉक्युमेंट आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

यूआयडीएआय पत्त्याचा पुराव्यासाठी पासपोर्ट, बँक स्टेटमेंट/पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट/पासबुक, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल/पाणी बिल/टेलिफोन लँडलाइन बिल/क्रेडिट कार्ड स्टेटमेंट/गॅस कनेक्शन बिल यासाठी कागदपत्रे ग्राह्य धरते (3 महिन्यांपेक्षा जुने नसावे) पासपोर्ट आणि मालमत्ता कर पावती (एक वर्षापेक्षा जुनी चालत नाही).

Aadhaar card update online
Tata Punch चे कोणते व्हेरियंट बसेल तुमच्या बजेटमध्ये? वाचा

आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स असल्यास, पुढील स्टेप्स फॉलो करा

- https://ssup.uidai.gov.in/ssup/ ही वेबसाईट उघडा

- त्यानंतर ‘proceed to update Aadhaar’ वर क्लिक करा

- यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल. एकदा ते पूर्ण झाल्यावर, व्हेरिफीकेशनसाठी captcha code एंटर करा.

- आता ‘Send OTP’ पर्यायावर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.

- अपडेट करण्यासाठी ‘Update Address’ पर्याय निवडा.

- तुम्हाला तुमचा बदललेला पत्ता येथे टाकावा लागेल आणि नंतर ‘Proceed’ वर क्लिक करा.

- वेबसाइटवर आता तुम्हाला स्कॅन केलेल्या डॉक्युमेट्सच्या स्वरूपात पत्त्याचा पुरावा सादर करण्यास सांगीतले जाईल. बटणावर क्लिक करून ते अपलोड करा.

- आपण केलेल्या बदलांचे प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर, UIDAI एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) पाठवेल. तुमच्या आधार कार्ड अपडेट प्रक्रियेची स्थिती तपासण्यासाठी या नंबरची आवश्यकता पडेल.

Aadhaar card update online
Kia ने लॉंच केली सर्वात स्वस्त SUV ची स्पेशल एडिशन, पाहा किंमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()