Mobile AC Remote : सारखं-सारखं रिमोट शोधत बसण्याची गरज नाही, तुमच्या स्मार्टफोनने चालवता येईल एसी; पाहा कसं?

Mobile Remote : प्ले स्टोअरवर असे कित्येक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही मोबाईलचा वापर रिमोट म्हणून करू शकता.
Mobile AC Remote
Mobile AC RemoteeSakal
Updated on

AC Remote : रिमोट ही प्रत्येक घरातील अशी गोष्ट आहे, जी नेमकी गरजेच्या वेळी हरवते. केवळ टीव्हीच्याच नाही, तर एसीच्या रिमोटच्या बाबतीत देखील हे लागू होतं. मात्र, खूप कमी लोकांना माहिती आहे की तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने देखील एसी ऑपरेट करू शकता. याबाबतची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..

स्मार्टफोनमध्ये IR ब्लास्टर गरजेचा

हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की काही ठराविक अँड्रॉईड स्मार्टफोनच तुम्ही रिमोट प्रमाणे वापरू शकता. आजकाल कित्येक स्मार्टफोनमध्ये IR-Blaster मिळतात. याच्या मदतीने तुम्ही मोबाईलचा वापर रिमोटप्रमाणे करू शकता. मोबाईलमध्ये IR ब्लास्टर नसेल, तर कोणतंही अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर तुमच्या कामी येणार नाही.

Mobile AC Remote
Fridge Tips : भिंतीपासून किती दूर असावा फ्रीज? लाखो लोक करतात 'ही' मोठी चूक; तुम्ही नका करू

अशा प्रकारे वापरा मोबाईल-रिमोट

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये IR-ब्लास्टर आहे का याची खात्री करा.

  • त्यानंतर IR Universal Remote किंवा याप्रकारचे अन्य अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवरुन डाऊनलोड करा.

  • आजकाल कित्येक ब्रँड्सचे स्वतःचे अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत. प्ले-स्टोअरवर एसीच्या कंपनीचं नाव लिहून तुम्ही हे अ‍ॅप्स सर्च करू शकता.

  • यानंतर अ‍ॅप ओपन करा आणि IR रिमोट हा पर्याय निवडा. यानंतर AC हा पर्याय निवडा.

  • यानंतर तुम्हाला एसीच्या ब्रँड्सची लिस्ट पहायला मिळेल. यातून तुमचा एसी निवडा. तुमचा एसी त्या यादीमध्ये नसेल, तर दुसरं अ‍ॅप ट्राय करू शकता.

  • यानंतर आपला फोन एसीकडे पॉइंट करा. मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला रिमोटप्रमाणेच एसी कंट्रोल करण्याचे पर्याय दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.