Meta AI : सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये मेटा ए.आय उपलब्ध! पण व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राममध्ये AI वापरायचं कसं? जाणून घ्या

Meta AI in India : मेटा कंपनीने त्यांचे अत्याधुनिक मेटा ए.आय चॅटबॉट भारतात लाँच केलं आहे. हे ए.आय सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये कार्य करेल.
Using Meta AI on WhatsApp and Instagram A Step-by-Step Guide
Using Meta AI on WhatsApp and Instagram A Step-by-Step GuideESAKAL
Updated on

AI iN Social Media Apps : भारतात आता तुमच्या आवडत्या सोशल मीडिया अॅप्स WhatsApp, Facebook, Instagram आणि Messenger मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) चॅटबॉट वापरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मेटा कंपनीने त्यांचे अत्याधुनिक मेटा ए.आय. चॅटबॉट भारतात लाँच केलं आहे. या चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही सोशल मीडियावर अधिक कार्यक्षमतेने वेळ घालवू शकता.

दोन महिन्यांपूर्वी इतर अनेक देशांमध्ये ही सेवा सुरू झाली होती. आता भारतातील वापरकर्तेही याचा लाभ घेऊ शकतात.

मेटाच्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, मेटा ए.आय. हा त्यांचा सर्वात प्रगत मॉडेल असलेला कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यक आहे. तो जटिल विश्लेषण करण्यास, सूचनांचे पालन करण्यास, कल्पनांचे दृश्यीकरण करण्यास आणि गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट थेट सर्च बारमध्ये सूचना आणि सल्ले देऊन वापरकर्त्यांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो.

Using Meta AI on WhatsApp and Instagram A Step-by-Step Guide
Whatsapp Dialer : नंबर सेव्ह करण्याची गरज नाही, थेट करा कॉल; व्हॉटसअ‍ॅपचं नवं अपडेट आलंय; फिचर्स जाणून घ्या

मेटा ए.आय. वापरण्याचे फायदे काय आहेत?

  1. विविध विषयांवर अद्ययावत माहिती मिळवा

  2. नोटिफिकेशन मिळवू शकता.

  3. वेगवेगळ्या आयडिया मिळवा.

  4. विविध भाषांमध्ये इमेज आणि मजकूर ट्रान्सलेट करता येईल.

  5. कविता लिहिता येतील.

  6. content Abbreviation करता येईल.

  7. व्यावसायिक ईमेल लिहू शकाल.

  8. कंटेंट लिहू शकता.

  9. इमेज तयार करू शकता.

  10. वेगवेगळ्या समस्या सोडवता येतील.

  11. आवडीनुसार काहीही सर्च करता येईल.

Using Meta AI on WhatsApp and Instagram A Step-by-Step Guide
Instagram Ads : इंस्टाग्रामवर जबरदस्ती बघाव्या लागणार जाहिराती? युजर्सना नाराज करून कंपनीची मोठी घोषणा

WhatsApp मध्ये मेटा एआय कसे वापरायचे?

  • WhatsApp मध्ये मेटा ए.आय. चॅटबॉट वापरण्यासाठी व्हॉट्सअॅप अॅप उघडा.

  • कोणत्याही चॅटवर जा.

  • चॅट टॅबवरील 'ब्लू रिंग' आयकॉनवर क्लिक करा.

  • प्ले स्टोअरवरून अपडेट इंस्टॉल केल्यानंतर, हा आयकॉन टॅप केल्यावर एक नवीन विंडो उघडेल.

  • या नवीन विंडोमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न टाईप करू शकता किंवा व्हॉइस इनपुट वापरून रेकॉर्ड करू शकता.

इंस्टाग्रामसाठी कसे वापराल?

इंस्टाग्राममध्ये मेटा ए.आय. वापरण्यासाठी कोणत्याही सुरू असलेल्या चॅट उघडा.

खाली असलेल्या मेसेज वर टॅप करा.

“@” एंटर करा आणि नंतर मेटा ए.आय. वर टॅप करा.

तुमचा प्रश्न किंवा मेटा ए.आय. ची विनंती एंटर करा आणि नंतर तुमच्या मेसेजच्या पुढील बाजूस असलेल्या आयकॉनवर टॅप करा.

तुमचा प्रश्न आणि मेटा ए.आय.चा प्रतिसाद चॅटमध्ये मेसेज म्हणून पाठवला जाईल.

आता तुम्ही फीड, चॅट आणि इतरत्र वापरून कार्य पूर्ण करू शकता, कंटेंट तयार करू शकता आणि विविध विषयांचा सखोल अभ्यास करू शकता. सोशल मीडिया अॅपमधून बाहेर पडण्याची गरज नाही कारण आता मेटा ए.आय. तुमच्या सोशल मीडिया अॅप्समध्येच उपलब्ध आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()