UPI Lite : पिन न टाकता झटपट ऑनलाइन पेमेंट्ची सुविधा; कसं वापराल UPI लाईट? वाचा एकच सोपी स्टेप..

UPI Lite Quick and PIN-less Payments : UPI चा सोपा आणि सुधारित पर्याय म्हणजे UPI लाईट. सामान्य UPI पेमेंट्स जिथं 1 लाख रुपयांची मर्यादा असते.
upi lite send money without pin
upi lite send money without pinesakal
Updated on

UPI Lite Payment : हल्ली तुम्ही UPI lite हा शब्द ऑनलाइन पेमेंटच्यावेळी खूपदा ऐकत असाल. आता तुमच्या छोट्या मोठ्या पेमेंट्ससाठी UPI पिन टायप करण्याची झंझट राहिलेली नाही. रिझर्व्ह बँकेने (RBI) UPI लाईट ही नवीन पेमेंट सिस्टम सप्टेंबर २०२२ मध्ये आणली होती; परंतु त्याचा फारसा वापर त्यावेळेस झाला नव्हता. या सोईस्कर सुविधेद्वारे तुम्ही दररोज झटपट आणि छोट्या रकमेचे पेमेंट्स करू शकता.

UPI लाईट म्हणजे काय? (what is UPI Lite)

UPI चा सोपा आणि सुधारित पर्याय म्हणजे UPI लाईट. सामान्य UPI पेमेंट्स जिथं 1 लाख रुपयांची मर्यादा असते तिथे UPI लाईटमध्ये फक्त एका वेळी 200 रुपये पाठवता येतात. पण तुम्ही तुमच्या बँक खात्यातून UPI लाईट वॉलेटमध्ये एका दिवसात दोनदा 2,000 रुपयेपर्यंत रक्कम भरायची सोय आहे. म्हणजेच, एकूण 4,000 रुपये तुम्ही दररोज UPI लाईट वापरून पाठवू शकता.

कोणत्या लोकांसाठी उपयुक्त?

दुकानदारी, रिक्षा भाडे, चहापाणी अशा छोट्या मोठ्या पेमेंट्ससाठी UPI लाईट खूपच फायदेशीर आहे. त्याशिवाय, तुम्हाला केव्हाही तुमचे UPI लाईट खाते बंद करायचे असले तर एका क्लिकमध्ये ते बंद करता येते किंवा तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रांसफर करता येतात. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.

upi lite send money without pin
iPhone 16 Launch Event : खुशखबर! उद्या लाँच होतीये बहुचर्चित iPhone 16 सीरिज, 'Apple Glowtime' इवेंटमध्ये नेमकं काय खास? वाचा

Google Pay, PhonePe आणि Paytm वर UPI लाईट कसे वापरावे?

Google Pay: तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा आणि "Pay Pin Free UPI Lite" निवडा. नंतर, सूचनानुसार तुमच्या UPI लाईट खात्यात रक्कम भरा.

PhonePe: होम स्क्रीनवरील "UPI Lite" वर टॅप करा किंवा तुमच्या प्रोफाइल पिक्चरवरून "Payment Methods" मधून "UPI Lite" निवडा. सूचनानुसार रक्कम भरा.

Paytm: होमपेजवर "Introducing UPI Lite" शोधा आणि त्यावर टॅप करा. समर्थित बँक खाते निवडा आणि UPI लाईटमध्ये रक्कम भरा. नंतर QR कोड स्कॅन करून किंवा UPI ID वापरून पेमेंट करा.

upi lite send money without pin
Online KYC Update : बँक अकाउंट KYC साठी रांगेत थांबताय? आता घरबसल्या मोबाईलवरून करा केवायसी अपडेट,वाचा सोपी प्रोसेस

UPI लाईटची खास वैशिष्ट्ये

पिनविरहित पेमेंट्स: ₹200 पेक्षा कमी रकमेचे पेमेंट्स करताना UPI पिन टायप करण्याची गरज नाही.

वेगवान आणि सोयीस्कर: पेमेंट्स झटपट आणि सोयीस्कर होतात.

दररोजची मर्यादा: तुम्ही तुमच्या UPI लाईट खात्यात एक दिवसात दोनदा, ₹2,000 पेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता (एकूण ₹4,000).

तुम्ही तुमचे UPI लाईट खाते कोणत्याही वेळी बंद करू शकता तसेच तुमच्या बँक खात्यात एका क्लिकमध्ये पैसे ट्रांसफर करू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.