व्हॉट्सअॅप प्रादेशिक भाषांमध्ये अनेक पर्याय ऑफर करते. यामध्ये हिंदी, तमिळ, गुजराती, कन्नड, बंगाली अशा अनेक भाषा यात सामाविष्ट आहेत.
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म तसेच मेटा मालकीच्या असलेल्या WhatsApp साठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतात (India) प्रत्येक राज्यात किंवा प्रदेशानुसार भाषा (Language) बदलते. अॅप प्रादेशिक भाषांमध्ये अनेक पर्याय ऑफर करते. यामध्ये हिंदी, तमिळ, गुजराती, कन्नड, बंगाली अशा अनेक भाषा सामाविष्ट आहेत,
व्हॉट्सअॅपवर तुम्ही दोन पद्धतीने भाषा बदलू शकता. पहिल्या पर्यायात तुम्ही संपूर्ण स्मार्टफोनची भाषा बदलू शकता. दुसऱ्या पर्यायात तुम्ही फक्त व्हॉट्सअॅपची भाषा बदलू शकता. यासाठी काही स्टेप्स लक्षात ठेवा.
व्हॉट्सअॅप आपोआप स्मार्टफोनच्या प्राथमिक भाषेशी जुळवून घेते. त्यामुळे तुम्ही फोनची भाषा हिंदी, बंगाली, तामिळ किंवा इतर कोणत्याही भाषेत बदलत असाल तर व्हॉट्सअॅप आपोआप त्या भाषेत दिसेल.
१) ओपन सेटींग्स- सिस्टीम- भाषा आणि इनपूट- भाषा (Open Settings → System → Language & input → Languages)
२) अॅड लॅंग्वेज वर क्लीक करून प्राधान्य असलेली भाषा निवडा.
१) आयफोन सेटींग- जनरल- भाषा आणि प्रदेश - भाषा (iPhone Settings →General → Language & Region → iPhone Language)
२) भाषा निवडा आणि भाषा बदलावर क्लिक करा.
१) सेटींग- पर्सनालायजेशनसाठी स्क्रोल करा- खाली स्क्रोल करून भाषा निवडा( Settings → scroll to the side to choose Personalisation →scroll down and choose Language)ट
२) तुमच्या आवडीची भाषा निवडून ओके दाबा,
हे सर्व करण्याबरोबरच तुम्ही व्हॉट्सअॅपच्या सेटींगवर जाऊन टॅप ऑन चॅटींग- अॅपची भाषा वर जाऊन भाषा निवडू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.