HP New Laptop : जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याची योजना आखत असाल तर HP ने दोन नवीन लॅपटॉप मॉडेल्स लॉन्च झाले आहेत. हे नवीन मॉडेल्स हलक्या वजनासह लाँच करण्यात आलेत, ज्यामुळे तुम्ही ते सहजपणे तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. या दोन्ही HP लॅपटॉप मॉडेल्समध्ये तुम्हाला काय स्पेसिफिकेशन्स मिळतील आणि या दोन्ही मॉडेल्सच्या किंमती काय आहेत याबद्दल माहिती घेऊ.
HP च्या 15 मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे आणि तुम्ही हे मशीन नॅचरल सिल्व्हर कलरमध्ये खरेदी करू शकता. दुसरीकडे, तुम्ही पॅव्हेलियन x360 मॉडेल 57,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह खरेदी करू शकता. परंतु हे मॉडेल फिकट गुलाबी सोनेरी रंगात उपलब्ध असेल. HP ने HP Pavilion Plus 14 (2023) ची किंमत 81,999u रुपये निश्चित केली आहे आणि हा लॅपटॉप फक्त नॅचरल सिल्व्हर कलरमध्ये खरेदी करता येईल.
HP 15 (2023) फीचर्स
HP 15 (2023) डिव्हाइसमध्ये 15.6-इंचाचा डिस्प्ले आहे जो पूर्ण HD रिझोल्यूशन देईल. यासोबतच तुम्हाला Intel Core i5-1335U प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 RAM आणि 1TB स्टोरेज आहे. लॅपटॉपच्या समोर व्हिडिओ कॉलिंगसाठी दिलेला वेबकॅम वाइड व्हिजन 720 पिक्सेल एचडी गुणवत्ता देतो.
HP Pavilion x360 (2023) चे फीचर्स
या लॅपटॉपमधील स्क्रीनचा आकार थोडा लहान आहे आणि तुम्हाला केवळ 14-इंचाच्या फुल एचडी डिस्प्लेसह काम करावे लागेल. यासोबत इंटेल i5-1335U प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. 1TB स्टोरेज 16GB DDR4 RAM देण्यात आलाय. लॅपटॉपमध्ये मल्टी-टच जेश्चर सपोर्टसह HP इमेजपॅड आहे.
HP Pavilion Plus 14 (2023) फीचर्स
या लॅपटॉपमध्ये 12 व्या जनरेशनचा इंटेल कोर i3-N305 प्रोसेसर देण्यात आला आहे, नावाप्रमाणेच या डिवाइसमध्ये 14-इंच स्क्रीन देखील आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी वेबकॅम 1080p फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.