उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

hyundai and kia recalling 485000 vehicles over fire risk check list Marathi Auto News
hyundai and kia recalling 485000 vehicles over fire risk check list Marathi Auto News
Updated on

Hyundai आणि Kia गाड्यांना आग लागण्याच्या धोक्यामुळे या दोन कंपन्याची तब्बल 4,85,000 वाहने परत मागवण्यात आल्या आहेत. Hyundai आणि Kia यूएस मधील सुमारे 4,85,000 वाहनांच्या मालकांना त्यांची वाहने त्यांच्या घराबाहेर पार्क करण्यास सांगण्यात आले आहे. कारण, ही वाहन उभे केले असले तरीही त्यांना आग लागू शकते. अँटी-लॉक ब्रेक कंट्रोल मॉड्युलमधील कन्टैमनेशनशी संबंधित समस्येमुळे कंपन्या त्यांची वाहने परत मागवत आहेत आणि या दोषामुळे वाहनात इलेक्ट्रिक शॉर्ट होऊ शकतो.

ही वाहने मागवली जात आहेत परत

जर आपण रिकॉल करण्यात आलेल्या वाहनांबद्दल बोलायचे झाले तर 2014 ते 2016 दरम्यान बनवलेल्या काही Kia Sportage SUV आणि 2016 ते 2018 दरम्यान बनवलेल्या काही K900 सेडान. त्याच वेळी, Hyundai च्या परत मागवलेल्या वाहनांमध्ये 2016 आणि 2018 मध्ये बनवलेल्या काही Santa Fe SUV, 2017 आणि 2018 मध्ये बनवलेल्या Santa Fe Sports, 2019 मध्ये बनवलेल्या Santa Fe XL आणि 2014 आणि 2015 मध्ये बनवलेल्या Tucson SUV चा समावेश आहे.

hyundai and kia recalling 485000 vehicles over fire risk check list Marathi Auto News
Hyundai अन् कश्मीर वाद काय? एका चुकीमुळं उठला कंपनीचा बाजार

ह्युंदाई करणार गाड्यांच्या कंट्रोल मॉड्युल्सचीही तपासणी

ऑटोमोबाईल कंपन्यांचे म्हणणे आहे की, यूएसमध्ये आगीच्या 11 घटना घडल्या आहेत, परंतु कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. मंगळवारी यूएस सेफ्टी रेग्युलेटर्सनी पोस्ट केलेल्या कागदपत्रांनुसार, ही वाहने दुरुस्त होईपर्यंत, मालकांनी त्यांना घराबाहेर पार्क करावे. त्यांना कोणत्याही घर किंवा इमारतीपासून दूर ठेवा. या वाहनांचे फ्यूज बदलण्याचे काम डीलर्स करणार आहेत. याशिवाय, ह्युंदाई डीलर्स कंट्रोल मॉड्यूलची चाचणी देखील करतील आणि आवश्यक असल्यास ते बदलतील. Hyundai मालकांना 5 एप्रिलपासून सूचित केले जाईल. त्याच वेळी, किया 31 मार्चपासून पत्र पाठवण्यास सुरुवात करेल.

hyundai and kia recalling 485000 vehicles over fire risk check list Marathi Auto News
Honda Shine 125cc ची अनोखी शाईन! ठरली 1 कोटी ग्राहकांची पहिली पसंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()