I-Phone Price : किडनी विकून देखील विकत घेता येणार नाही हा i-Phone ; किंमत आहे 390 कोटी

Apple iPhone बद्दल युजर्सची क्रेझ जग जाहीर
I-Phone Price
I-Phone Priceesakal
Updated on

I-Phone Price : Apple iPhone बद्दल युजर्सची क्रेझ जग जाहीर असून आयफोन्सबद्दल फोन युजर्समध्ये प्रचंड आकर्षण आहे. जबरदस्त फीचर्समुळे आयफोन हवा असतो. Apple चे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी ९ जानेवारी २००७ रोजी पहिल्या आयफोनचे अनावरण केले होते. स्टीव्ह जॉब्सच्या या शोधाने मोबाईल फोनचे भविष्य पूर्णपणे बदलून टाकले.

I-Phone Price
Athiya-Rahul wedding: अथिया-राहुलच्या लग्नाचा शुभ मुहूर्त ठरला! संगीत कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल..

तेव्हापासून आतापर्यंत जगभरातील लोकांमध्ये आयफोनची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. विशेष म्हणजे, आयफोनच्या या क्रेझचा अंदाज यावरून लावला येईल की, २००७ मध्ये लाँच झालेला आयफोनचा सीलबंद बॉक्स अमेरिकेत एका लिलावादरम्यान तब्बल ३५,००० हजार डॉलर्स (सुमारे २८ लाख) रुपयांमध्ये विकला होता.

I-Phone Price
Chutney Batata Recipe : तिच तिच भाजी पोळी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा चटपटीत चटणी बटाटा रेसिपी

पण आज तुम्हाला अशा महागड्या आयफोन बद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 360 कोटी रुपये आहे.. विश्वास नाही ना बसला... होय, FALCON SuperNova iPhone 6 हा रत्नजडित फोन तेव्हढाच महाग आहे.न्यूयॉर्क स्थित कंपनी फाल्कनने 2021 मध्ये आयफोनचं सर्वात महाग मॉडेल 48.5 दशलक्ष युएस डॉलर (सुमारे 390 कोटी रुपये) लाँच केलय.

I-Phone Price
Lifestyle: खरचं रोज लटकल्याने उंची वाढते का?

फाल्कन कंपनी 24 कॅरेट सोने आणि हिरे वापरून महागड्या वस्तू बनवण्यात आघडीवर आहे. जगातील सर्वात महागडा आयफोन लॉन्च करण्यासोबतच, कस्टमाइजेशन आणि युझर्स सोबत कनेक्ट होण्यासाठी आयफोनशी थेट टायअप केलाय.

I-Phone Price
Heart Attack : हिवाळ्यात अंघोळ करताना 'ही' चूक करू नका नाहीतर येऊ शकतो हार्ट अटॅक

गुलाबी रंगाचा रत्नजडित आयफोन

FALCON SuperNova iPhone 6 मध्ये Apple लोगोच्या खाली एक मोठा गुलाबी डायमंड आहे. हा रेक्टेंगुलर बेझलने वेढलेला आहे. डायमंडच्या सेफ्टीसाठी कंपनी आयफोनसाठी विविध प्रकारच्या होल्डरचा वापर करते. याशिवाय डायमंडचा आकारही फोनच्या सेटिंगवर बेस्ड असतो.

I-Phone Price
Travel Tips : क्रूर प्राण्यांनी गजबलेलं बेट, जेवण सुद्धा हेलिकॉप्टरने पोहचवावं लागतं

FALCON SuperNova iPhone 6 फीचर्स

सर्वात महाग असलेला हा iPhone 128GB स्टोरेजसह येतो. iPhone 6 आणि iPhone 6 Plus मॉडेल अनलॉक करण्यात आलेत. याचा अर्थ तुम्ही ते कोणत्याही नेटवर्कवर वापरण्यास सक्षम असाल.हा आयफोन घेणाऱ्या यूजर्सना 4.7 इंच आणि 5.5 इंच स्क्रीन डायगोनलचा ऑप्शन मिळेल.याशिवाय यूजर्सना प्लॅटिनम बॉडीचा ऑप्शन मिळेल. युजर्सना हवं असेल तर ते 18 आणि 24 कॅरेट सोन्याच्या पर्यायांमध्ये सर्वात प्रीमियम आयफोन खरेदी करू शकतात.फाल्कनच्या या आयफोन मध्ये रोझ गोल्ड ऑप्शन पण देण्यात आलाय.

I-Phone Price
Auto Tips : इलेक्ट्रिक स्कूटी चालवणे स्वस्त होईल की महाग? जाणून घ्या कॅलक्युलेशन

आयफोनच्या महागड्या किमतीवर मीम्स

खरं तर, आयफोनची किंमत सुमारे 1.5 लाखांच्या आसपास असतेच. त्यामूळे आयफोनच्या अव्वाच्या सव्वा किंमतीबद्दल मीम्स अनेकदा व्हायरल होतात. सोशल मीडियावर तर काही मिम्स किडणीशी रिलेट केलेत. त्यात असं म्हंटलय की, एवढा महाग फोन घ्यायचा असेल तर माणसाला त्याची किडनी विकावी लागेल. पण फाल्कनचा आयफोन इतका महाग आहे की कोणालाही एवढी तसदी घेण्याची देखील गरज भासणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.