वीजेविना चालवायचा असेल टीव्ही, फ्रीज, एसी तर लगेच खरेदी करा हे उपकरण

तुम्हीही अशा भागात राहत असाल जिथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल, तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Portable power station
Portable power stationgoogle
Updated on

मुंबई : जर तुम्हाला खूप प्रवास करायला आवडत असेल, तर पोर्टेबल चार्जिंग बॅटरी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. तुमची बॅटरी केवळ तुमचे पॉवर स्टेशनच नाही तर कधी कधी घराबाहेरही तुमचे जीवनरक्षक असते. त्यामुळे, तुम्हीही अशा भागात राहत असाल जिथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल, तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही पोर्टेबल चार्जिंग बॅटरी तुम्हाला वीज नसतानाही वीज पुरवेल.

Portable power station
Forgot password of phone : फोनचा पासवर्ड विसरलात ? अशाप्रकारे अनलॉक करा फोन

Oukitel P2001 पोर्टेबल पॉवर स्टेशन

Oukitel कंपनीचे P2001 पोर्टेबल पॉवर स्टेशन हे एक अतिशय सुरक्षित आणि कार्यक्षम पॉवर स्टेशन आहे जे तुमची सर्व वीज टंचाई पूर्ण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. कंपनीने सर्व तात्पुरत्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे शक्तिशाली बनवले आहे.

या पॉवर स्टेशनमध्ये पॉवर स्टोरेज आणि डिस्चार्ज सिस्टम आहे. जानेवारी 2022 मध्ये लाँच केलेले, Oukitel P2001 हे घरातील वीज आउटेज, कॅम्पिंग, RV आणि आपत्ती निवारणादरम्यान वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

Portable power station
EV bike : १ रुपयात ५ किमी चालेल ही स्कूटर; फक्त १० हजारांत आणा घरी

Oukitel P2001 पोर्टेबल पॉवर स्टेशन बॅटरी

Oukitel P2001 पॉवर स्टेशनमध्ये 2000Wh (LiFePO4) बॅटरी आहे, जी त्याच्या उत्पादनांच्या लाइनअपमधील सर्वात मोठी बॅटरी आहे. हे उपकरण 2000W (सर्ज 4000W) च्या रेट केलेल्या आउटपुटसह येते आणि आपल्या घरातील टीव्ही, मायक्रोवेव्ह, राईस कुकर, फ्रिज, कॉफी मेकर इत्यादी 99% इलेक्ट्रिक उपकरणांना उर्जा देण्यासाठी वापरले जाऊ शकते.

या P2001 च्या मदतीने तुम्ही तुमच्या घरी असलेल्या हेवी ड्युटी मशीन जसे की इलेक्ट्रिक ड्रिल, सर्कुलर सॉ, बेंच ग्राइंडर इ. ऑपरेट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.