देशातील विशेषत: दक्षिणेकडील केरळसारख्या राज्यात हत्तींनी मनुष्यांवर हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. भारतीय वन सेवेतील (आयएफएस) छत्तीसगड केडरच्या अधिकाऱ्याने हत्ती-मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ॲप विकसित केले आहे. वरुण जैन असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते छत्तीसगडमधील गारियाबंद जिल्ह्यातील उदांती सीतानदी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक आहेत.