Electric Bike : अवघ्या ३५ हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; ९० सेकंदात बदलली जाणार बॅटरी

वाढत्या महागाईच्या काळात अनेकजण आता इलेक्ट्रिक गाड्या खरेदीकडे वळताना दिसत आहे.
Electric Bike
Electric BikeSakal
Updated on

Budget Electric Bike : वाढत्या महागाईच्या काळात अनेकजण आता इलेक्ट्रिक गाड्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. त्यात अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन गाड्या लाँच करत आहेत.

या स्पर्धेत आता इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी बाज (BAAZ Bike) बाइक्सनेही प्रवेश केला आहे. कंपनीने त्यांची नवीन इलेक्ट्रिक (Electric Bike) स्कूटर Baz लॉन्च केली असून, या गाडीची किंमत अवघी ३५ हजार रुपये असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे या स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे गाडीतील बॅटरी संपल्यानंतर तुम्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवरून बॅटरी बदलून नॉन स्टॉप गाडी चालवण्याचा आनंद लूटू शकणार आहात. या गाडीचा टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज भासणार नाही. बाज ई-स्कूटरची रचना आणि विकास आयआयटी-दिल्ली आधारित ईव्ही स्टार्ट-अपने केली आहे.

Electric Bike
Video: इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून चक्क शहरात फिरवली, व्हिडीओ व्हायरल

90 सेकंदात बदलली जाणार बॅटरी

Baz इलेक्ट्रिक स्कूटर खास डिलिव्हरीसाठी तयार करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी (Electric Battery) अवघ्या 90 सेकंदात बदलली जाऊ शकते. त्यामुळे जे लोक एका दिवसात 100 किमी पेक्षा जास्त प्रवास करतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Electric Bike
येतेय हार्ले-डेव्हिडसनची परवडणारी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स

टॉप स्पीड 25km/h

Baaz इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला अॅल्युमिनियमच्या आवरणात लिथियम-आयन सेल्ससह सुसज्ज पॉड्स देण्यात आले आहेत. यात बसवण्यात आलेल्या बॅटरीचे वजन 8.2 किलो आहे. या गाडीमध्ये आग, पूर किंवा तत्सम परिस्थिती आढळून आल्यास रायडरला अलर्ट करते. या गाडीचा टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. त्यामुळे ही गाडी चालवण्यासाठी परवान्याची गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()