नवीन स्मार्टफोन घेताय? या काही महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

important tips for buying new smartphone know how to choose a best smartphone
important tips for buying new smartphone know how to choose a best smartphone
Updated on

स्मार्टफोन ही आता प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. क्वचितच असा कोणी असेल ज्याच्याकडे स्मार्टफोन नसेल. ऑनलाइन क्लास असो किंवा ऑफिस मीटिंग, स्मार्टफोन तुमची सगळी कामे सोपी करतो. त्यामुळेच चांगला आणि बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असणे गरजेचे झाले आहे. पण अनेक वेळा आपण सर्व फीचर न तपासता मोबाईल घेतो. पण याचा परिणाम असा होतो की थोड्याच वेळात आपल्याला त्रास होऊ लागतो. त्यामुळे जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर मार्केटमधील वेगवेगळ्या कंपनीच्या स्मार्टफोनमधील हे फीचर्स नक्की तपासा

मोबाईल खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमचे बजेट ठरवा. जसे की 10 हजार, 15 हजार, 20 हजार यानंतरच तुम्ही या फीचर्सची तुलना त्या बजेटच्या इतर उपलब्ध फोनसोबत करा.

1. बॅटरी बॅकअप

जर तुम्हाला दीर्घकाळ बॅटरी टिकणारा फोन हवा असेल, जो तुम्हाला पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज पडणार नाही किंवा जर तुमचे काम मोबाईलवर आधारित असेल आणि तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचा वापर जास्त असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये किती बॅटरी दिली जात आहे ते पाहा. साधारणपणे 3500 mAh ते 4000 mAh बॅटरी चांगली असते. पण तुम्हाला आणखी जास्त काळ टिकणारा फोन हवा असेल, तर तुमच्यासाठी 6,000 mAh पर्यंतचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

2. ऑपरेटिंग सिस्टम

तुम्ही फोन खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला फोन कोणत्या OS वर म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणारा हवा आहे ते ठरवा. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे ठरवू शकता. परंतु लेटेस्ट ओएस वापरणे चांगले मानले जाते. सध्या OS ची लेटेस्ट आवृत्ती 12 बाजारात आहे. पण ते फोन थोडे महाग असू शकतात.

3. स्टेबिलीटी

फोनचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा, हे मॉडेल जुने आहे का, ते किती काळापासून बाजारात विकले जात आहे ते शोधा. बरेचदा असे दिसून येते की आपण नवीन फोन घेतो पण काही वेळातच त्यांचा परफॉर्मन्स बिघडू लागतो.

important tips for buying new smartphone know how to choose a best smartphone
फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

4. रॅम

तुम्ही तुमच्या फोनमध्ये किती डेटा साठवता किंवा तुम्ही किती अॅप्स वापरता यावर आधारित तुमच्या फोनची RAM मेमरी निवडा. लक्षात ठेवा की जास्त रॅम असलेले फोन थोडे महाग असतील.

5. SD-कार्ड डेडिकेटेड स्लॉट

तुम्हाला अधिक स्टोरेजची आवश्यकता असल्यास, SD-कार्ड डेडिकेटेड स्लॉटसह मेमरी स्पेस असलेला फोन खरेदी करा. आजकाल अनेक फोनमध्ये तुम्हाला चांगले इंटरनल स्टोरेज दिले जाते, त्यानंतर तुम्हाला वेगळ्या मेमरी कार्डची गरज नसते. आणि त्यामुळे या फोनमध्ये कार्ड स्लॉट दिलेला नसतो. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार यासंबंधी निर्णय घ्या

important tips for buying new smartphone know how to choose a best smartphone
Vi चा 599 चा प्रीपेड प्लॅन, देतोय Jio-Airtel पेक्षा भारी बेनिफिट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.