इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी Ampere इलेक्ट्रिकने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ampere Magnus EX भारतीय बाजारात लॉंच केली आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी Ampere इलेक्ट्रिकने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऍम्पीयर मॅग्नस एक्स (Ampere Magnus EX) ही भारतीय बाजारात सादर केली आहे. स्कूटरची किंमत 68,999 रुपये (एक्स-शोरूम, पुणे) आहे. यामध्ये दीर्घ श्रेणीसह अनेक नवीन आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कंपनीचा दावा आहे, की या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 121 किलोमीटरपर्यंत आहे (ARAI टेस्ट). ही स्कूटर Ola S1 सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.
10 सेकंदात 40 किमीचा वेग
Ampere मॅग्नस एक्स स्कूटर हलकी असून, यात पोर्टेबल लिथियम बॅटरी वापरली आहे. कंपनीचा दावा आहे, की त्याच्या डिटेक्टेबल बॅटरी सेटअपमुळे घर, ऑफिस, कॉफी शॉप किंवा कोणत्याही प्लग-ऑन-वॉल चार्ज पॉईंटवर कोणत्याही 5-amp सॉकेटवरून चार्ज करणे सोपे होते. स्कूटरला 1200 वॉटची मोटर आहे. स्कूटर 10 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग पकडते. यात दोन राईडिंग मोड आहेत - सुपर सेव्हर इको मोड आणि पेपर पॉवर मोड.
Ampere मॅग्नस एक्स स्कूटरची वॅशिष्ट्ये...
याला एलईडी हेडलाइट, 450 मिमी मोठी लेगरूम स्पेस, की-लेस एंट्री, व्हेइकल फाइंडर, अँटीहेफ्ट अलार्म, बॅटरी काढण्यास सोपे असे फीचर्स देण्यात आले आहेत. यात ड्रायव्हिंगच्या अधिक सोयीसाठी डिझाइन केलेली एक विस्तृत सीट आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मेटॅलिक रेड, ग्रेफाइट ब्लॅक आणि गॅलेक्टिक ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येते. विविध राज्य सरकारांच्या ई-वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत ही ई-स्कूटर लोकांना अधिक आकर्षक किमतीत उपलब्ध होईल, असे कंपनीने म्हटले आहे.
मॅग्नस एक्स स्कूटर 53 किलोमीटर प्रतितासापर्यंतच्या टॉप स्पीडसह येते. त्याला 121 किमीपर्यंत ARAI प्रमाणित रेंज मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, शहरामध्ये प्रवास करणारे एका चार्जमध्ये मॅग्नस एक्स तीन दिवस चालवू शकतात. कंपनीने सांगितले, की मॅग्नस एक्ससह ग्राहकांना अतिरिक्त पॉवर परफॉर्मन्स व अतिरिक्त बचतही होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.