शिक्षक रियाज तांबोळी यांच्या साथीने पृथ्वीराज लाळे व शिवम भालेराव या चिमुकल्यांनी लॉकडाउन काळात तो प्रकल्प यशस्वी केला आहे.
सोलापूर : कोळसा (Coal), पेट्रोलियम इंधन (Fuel) संपल्यानंतर काय, या प्रश्नाचे उत्तर शोधताना शेतात राहणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बोकडांच्या मदतीने वीज (Electricity) तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. बैलशक्तीवर वीज निर्मितीच्या प्रयोगाचा अभ्यास करून त्यांनी सध्या बैलांची संख्या कमी असल्याने त्याला बोकडांचा पर्याय निवडला आहे. बोकडाच्या शक्तीचा उपयोग करून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प पूर्ण केला आहे. शिक्षक रियाज तांबोळी (Riyaj Tamboli) यांच्या साथीने पृथ्वीराज लाळे (Pruthviraj Lale) व शिवम भालेराव (Shivam Bhalerao) या चिमुकल्यांनी लॉकडाउन (Lockdown) काळात तो प्रकल्प यशस्वी केला आहे.
कोरोना काळात शाळा बंद झाल्या होत्या, सर्वांना घराबाहेर पडता येत नव्हते. अशावेळी कोरोनापूर्वी पाहिलेले प्रकल्प आठवून काहीतरी प्रयोग करावेत, अशी कल्पना करून विद्यार्थ्यांनी विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चिमुकल्यांनी विविध वस्तू, प्रकल्प तयार केले. शेजबाभूळगाव (ता. मोहोळ) येथील पृथ्वीराज व शिवम हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिकतात व वस्तीवर राहतात. त्यांच्याकडे अनेकदा रात्री वीज नसते. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून त्यांनी बैलाच्या शक्तीवर तयार होणारी वीज दुसऱ्या प्राण्याचा वापर करून तयार करता येईल का, यादृष्टीने अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी बोकडाची निवड केली. वैज्ञानिक अरुण देशपांडे, पैगंबर तांबोळी, प्रिसिजन फाउंडेशन आणि सर फाउंडेशनचे यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा, झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी, सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे यांनी त्या विद्यार्थ्यांना मोलाची साथ दिली. त्यातून हा प्रकल्प यशस्वी झाला आणि सर्वांनीच त्यांचे कौतुक केले.
अशी तयार होते वीज
ग्रामीण भागात अनेकदा रात्रीच्या वेळी वीज जाते. त्यामुळे अभ्यास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. या चिमुकल्यांनी त्याचा विचार करून नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला. दोन बोकडांच्या माध्यमातून वर्तुळाकार एक चाक फिरवले जाते. त्यातून तयार होणाऱ्या विजेवर बॅटरी चार्ज करून ठेवली. रात्रीही त्यावर घरातील दिवे लागतील. दिवसभरात फक्त दोन तास शेळी किंवा बोकड गोलाकार फिरवून बॅटरी, तसेच मोबाईल चार्ज करून ठेवता येतो. या प्रयोगातून विजेची ही समस्या आता दूर होईल, असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, अजीज तांबोळी, तिपन्ना कमळे, बाबासाहेब शिंदे, अनघा जहागीरदार, राजकिरण चव्हाण, नवनाथ शिंदे, स्वाती गवळी, पांडुरंग येळवे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.