Income Tax Return Scam : आता आयटी रिटर्न भरतानाही बसू शकतो गंडा; घ्या ही काळजी

आजकाल सर्वकाही डिजीटल होत असल्याने ऑनलाइन बँक घोटाळे आणि विविध स्कॅम्स वाढतच आहेत
Income Tax Return Scam
Income Tax Return Scamesakal
Updated on

Income Tax Return Scam :आजकाल सर्वकाही डिजीटल होत असल्याने ऑनलाइन बँक घोटाळे आणि विविध स्कॅम्स वाढतच आहेत. हॅकर्स स्कॅम करुन केवायसी, क्रेडिट कार्ड किंवा बँकंबधी इतर बनावट मेसेजद्वारे लोकांना फसवतात, ते विशेषत: पॅन अपडेटसारख्या तातडीच्या कामांचा बहाणा करुन नागरिकांना लक्ष्य करतात.

Income Tax Return Scam
Marathi Tech Portal : सोलापूरच्या सूरज बागलांच्या ‘मराठी टेक पोर्टल’ची सातासमुद्रापार कीर्ती

बनावट पॅन अपडेट घोटाळ्याप्रमाणेच, एक नवीन घोटाळा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्कॅमर्स इन्कम टॅक्स रिटर्न पूर्ण करण्यात व्यस्त असलेल्यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. या स्कॅममध्ये, स्कॅमर्स इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेचा फायदा घेत आहेत आणि टॅक्स टाइम स्मिशिंगद्वारे भारतीय खातेदारांना लक्ष्य करत आहेत.

Income Tax Return Scam
OpenAI : चॅट जीपीटीचं पुढचं व्हर्जन आणणार का?

वापरकर्त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करण्यासाठी फसवण्याच्या उद्देशाने ते बँक खातेधारकांना बनावट मजकूर मेसेज पाठवत आहेत, जे लोकप्रिय भारतीय बँकांचे असल्याचे दिसते. ज्यानंतर त्यांची खाजगी माहिती घेऊ त्यांना लुटलं जातं.

Income Tax Return Scam
OpenAI Bug Bounty Program : शोधा ChatGPT मधील चुका आणि मिळवा 16 लाखांपर्यंतचं बक्षीस

दरम्यान Spohos ने नोंदवल्याप्रमाणे, स्कॅमर प्राप्तकर्त्याचे बँक खाते ब्लॉक केले जाईल असा दावा करणारे बनावट मेसेज पाठवत आहेत आणि त्यांना त्यांच्या खात्यांवर त्यांचे पॅन आणि आधार कार्ड माहिती अपडेट करण्याची विनंती करत आहेत. या मजकूर संदेशांमध्ये Android पॅकेज (APK) फाइल डाउनलोड करण्यासाठी लिंक देखील समाविष्ट आहे. हे ॲप्लिकेशनसह इन्स्टॉल केल्यावर, ॲप अगदी बँक ॲप्लिकेशनसारखे दिसते आणि युजर्स आपली माहिती यात अपडेट करताच लगेचच त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे चोरी केले जातात.

Income Tax Return Scam
Car Tips : कार चालवतांना अचानक क्लच अडकतोय? या टिप्स करतील १००% मदत...

टॅक्स-टाइम स्मिशिंग स्कॅम म्हणजे काय?

टॅक्स टाइम स्मिशिंग स्कॅमच्या प्रकरणांमध्ये, स्कॅमर आयकर रिटर्न भरण्याच्या कालावधीत लोकांना लक्ष्य करतात. स्कॅमर बनावट मजकूर संदेश पाठवतात जे प्राप्तकर्त्याच्या बँकेकडून असल्याचा दावा करून एक धोकादायक Android पॅकेज (APK) ही फाइल डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवतात. एकदा ॲप इन्स्टॉल केल्यावर, APK फाईल बनावट पेज उघडून तुमचे बँकिंग डिटेल्स घेते. मग वैयक्तिक माहिती त्या मध्ये अपडेट केल्यावर लगेचच स्कॅमर्स सर्व पैसे आणि खाजगी माहिती मिळवून तुमच्या बँक अकाउंटवर डल्ला मारतात

Income Tax Return Scam
Bike Tips For Summer : बाईक रायडिंग करताना अशी घ्या काळजी

या स्कॅमपासून कसं वाचाल?

1. जेव्हा तुम्हाला तुमच्या बँकेशी संबंधित माहिती किंवा आर्थिक माहिती विचारणारे मेसेज येतात तेव्हा काळजी घ्या.

2. इमेलला अटॅच फाईल डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगा आणि कोणत्याही फाइल्स उघडण्यापूर्वी किंवा डाउनलोड करण्यापूर्वी नेमक्या त्या कोणी पाठवल्या आहेत त्याची खात्री करुनच उघडा.

Income Tax Return Scam
Corona Virus Safety : कोरोना पुन्हा वाढत आहे! हे 5 गॅजेट्स घरात ठेवा, काम होईल सोपे

3. तुम्हाला तुमच्या बँकेकडून किंवा इतर कोणत्याही सेवा प्रदात्याकडून अनपेक्षित मेसेज मिळाल्यास, त्यांच्या अधिकार्‍यांशी थेट फोनद्वारे किंवा ऑफिशिअल वेबसाइट किंवा ॲप किंवा जवळच्या शाखेद्वारे संपर्क साधा.

4. तुम्हाला असे एसएमएस मिळाले असल्यास, तुम्ही phishing@irs.gov वर ईमेल पाठवून किंवा संबधित मजकूर/एसएमएसची प्रत पाठवून अशा फसवणुकीची तक्रार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.