Battery Saving Tips: प्रवास करताना तुमच्याही Mobile ची बॅटरी लवकर उतरतेय, मग या ट्रीक्सने वाढवा battery backup

खास करून प्रवास करत असताना म्हणजेच रेल्वे किंवा बस प्रवास, गाडीने, मेट्रोने प्रवास करत असताना मोबाईलची बॅटरी लवकर उतरत असल्याचं तुमच्या निरिक्षणास आलं असले. प्रवासात बॅटरी लवकर का डिस्चार्ज होते असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल
Battery Save battery during travelling
Battery Save battery during travellingEsakal
Updated on

Battery Saving Tips: सध्याच्या काळात आपल्या हातातील स्मार्ट फोन ही अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे.

स्मार्ट फोन हे आता केवळ संपर्काचं साधन राहिलं नसून स्मार्ट फोनमुळे Smart Phone आपण विविध अॅपच्या Apps मदतीने पैशांची देवाण घेवाण करू शकतो, शॉपिंग करणं, घरी एखादी वस्तू मागवणं, हिशोब ठेवणं, विविध पॉलिसी, महत्वाचे दस्तावेज सारं काही या स्मार्ट फोनमध्ये असल्याने तो सतत सोबत असणं गरजेचं असतं. Increase Battery back up of your Smartphone

यासाठीच घराबाहेर पडताना आपला मोबाईल पूर्ण चार्ज असणं आता महत्वाचं ठरलं आहे. खास करून जर संपूर्ण दिवस आपण घराबाहेर असलो किंवा प्रवासात असलो तर मोबाईलची बॅटरी Mobile Battery लवकर डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. यासाठी काहीजण पाॅवर बँक Power Bank किंवा दोन मोबाईलचे पर्याय निवडता. 

खास करून प्रवास करत असताना म्हणजेच रेल्वे  किंवा बस प्रवास, गाडीने, मेट्रोने प्रवास करत असताना मोबाईलची बॅटरी लवकर उतरत असल्याचं तुमच्या निरिक्षणास आलं असले.

प्रवासात बॅटरी लवकर का डिस्चार्ज होते असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर आज आम्ही तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देणारं आहोत. सोबतच बॅटरी बॅकअप टाइम कसा वाढता येईल यासाठी तुम्हाला काही टिप्स देखील देणार आहोत. 

टॉवर किंवा सर्विस प्रोव्हायडर बदलणं

आपल्या फोनमधील एंटिना हा सतत नेटवर्क सर्विस प्रोव्हायडर टॉवरशी कनेक्टेड असतो.

जेव्हा तुम्ही ट्रेन किंवा बसने प्रवास करता तेव्हा पुढे पुढे जात असताना सतत सर्विस प्रोव्हायडर टॉवर बदलत राहतात. यावेळी मोबाईलमधील अँटेना चांगल्या नेटवर्कसाठी सतत जवळच्या टॉवरशी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. 

दर ठराविक किलोमीटरनंतर सर्विस प्रोव्हायडर बदलत असल्याने मोबाईलही सतत नेटवर्क बदलत राहतो. सतत वेगवेगळ्या टॉवरशी कनेक्ट होण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅटरी खर्च होते. यामुळेच प्रवासात मोबाईलची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. 

हे देखिल वाचा-

Battery Save battery during travelling
Power Bank : चार्जरशिवाय तुमचा फोन चार्ज करा, या तीन पॉवर बँक्स देतील साथ

इंटरनेट आणि GPS

अलिकडे अनेक कारणांसाठी स्मार्ट फोनचा वापर वाढू लागला आहे. या खास करून सोशल मीडिया ब्राउझिंग आणि मोबाईलमध्ये विविध ओटीटी चॅनल्सवर सिनेमा किंवा वेब सीरिज पाहणं.

जेव्हा प्रवासात तुम्ही इंटरनेटचा वापर करून विविध व्हिडीओ किंवा रिल्स तसचं सोशल मीडियाचा वापर करत असता. तेव्हा सतत डाटा प्रोव्हायडर बदलल्याने देखील मोबाईलची बॅटरी लवकर उतरते. 

त्याच प्रमाणे आपण अनेकदा फोनमधील GPS म्हणजेच लोकेशन सुरु ठेवल्यास तसचं जर तुम्ही प्रवासादरम्यान मॅपचा वापर करत असाल तरी देखील मोबाईलची बॅटरी लवकर डिस्चार्ज होवू शकते. 

काही ट्रीक्स वापरून मोबाईलचा बॅटरी टाईम सेव्ह करणं शक्य आहे. यासाठी काय कराव हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

असा वाढवा मोबाईलच्या बॅटरीचा बॅकअप टाइम

  •  प्रवासात तुम्हाला जास्त काळ बॅटरी टिकवायची असेल तर गरज नसेल तेव्हा मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवा. यामुळे टॉवरचं नेटवर्क शोधण्यासाठी खर्च होणारी बॅटरी वाचू शकते. 

  • तसचं मोबाईलचं लोकेशन तसचं GPS बंद ठेवा यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होणारी बॅटरी सेव्ह करणं शक्य आहे. 

  • जर तुम्हाला काही महत्वाचे कॉल येणार असतील तर तुम्ही फोन 2G मोडवर टाकू शकता. 

  • मोबाईल एलोप्लेन मोडवर टाकणं शक्य नसेल तर मोबाईलचा डेटा बंद करा. यामुळे देखील बॅटरी लवकर डिस्चार्ज होणार नाही. 

  • तुम्हाला प्रवासामध्ये काही तरी मनोरंजन हवं असले तर दुरच्या प्रवासाआधी तुम्ही काही सिनेमा किंवा व्हिडीओ तसचं बेव सिरीज ऑफलाईन पाहण्यासाठी डाऊनलोड करून ठेवू शकता. ऑनलाईन व्हिडीओ पाहण्याच्या तुलनेत ऑफलाइन सिनेमा किंवा व्हिडीओसाठी बॅटरी कमी खर्च होते. 

  • तसंच जर तुमच्या सर्व ऍपचे नोटिफिकेशन्स ऑन असतील तर सेटिंगमधून हे नोटिफिकेशन बंद करा. यामुळे देथील काही प्रमाणात बॅटरी सेव्ह होवू शकते. 

  • तसचं मोबाईलच्या सेटिंगमध्ये असलेला बॅटरी सेव्ह मोड ऑन ठेवा. 

अशा प्रकारे तुम्ही प्रवासामध्ये बॅटरीचा बॅकअप टाइम वाढवू शकता.

प्रवासामध्ये संपर्क साधण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या कामासाठी फोनची बॅटरी चार्ज असणं गरजेचं आहे. यामुळेच प्रवासात सोशल मीडिया किंवा इतर ब्राउझिंग करण्यापेक्षा प्रवासाची मजा लुटा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.